esakal | Pune: सलग ७५ तास कोरोना लसीकरण मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

पुण्यात सलग ७५ तास कोरोना लसीकरण मोहिम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोरोना लसीकरणाचा फायदा होत आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात सलग ७५ तासाची (तीन दिवस तीन तीस) खास लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शहर व जिल्ह्यातील शाळा येत्या चार आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालकांची त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता झाली आहे. मात्र शहरातील बहुतांशी पालकांची त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची मानसिकता झालेला नाही, असे शाळांनी पालकांकडून मागविलेल्या संमतिपत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळांनी पूर्ण पुर्वतयारी व नियोजन केले आहे. त्यांनी आपापल्या परीने काही शाळांनी आठवड्यातील तीन, काहींनी दोन तर, काहींनी पाच दिवस |ऑफलाइन शाळेचे नियोजन केले आहे.

हेही वाचा: अकोला : लक्झरी बस अडवून ५० लाख रूपयांची रोकड लंपास

दरम्यान, काही पालकांनी आता दिवाळी जवळ आली आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी लागणार आहे. मग आता घाई कशाला, दिवाळीनंतर बघू, अशी भूमिका घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.

.... तरीही कोरोना नियम पाळणे अनिवार्य

आता कोरोना संसर्ग कमी झाला आहे. लसीकरणही बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना संपला, या भ्रमात राहून कोरोना नियम पाळणे टाळू नका. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे मास्कचा नियमित वापर, पुरेसे अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना केले आहे.

loading image
go to top