

Madras High Court
esakal
Madras High Court on Temple Entry Rights : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती न्यायालयाकडे दाद मागू शकते का? मद्रास उच्च न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अमेरिकेतील एका महिलेची हिंदू धर्मावर श्रद्धा जडली; तिने सर्व काही सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला. तिला एका मंदिराला भेट द्यायची होती, परंतु प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर तिला ' तुम्ही बाहेरील व्यक्ती'असल्याचे कारण देत प्रवेश नाकारण्यात आला आणि देवदर्शन घेण्यापासून रोखले गेले.