देशविरोधी कारवायांसाठी वापर झाल्यास मदरशे उद्ध्वस्त करू; 'या' मुख्यमंत्र्यांचा इशारा

जिहादसंबंधी काही कागदपत्रे मदरशांमधून जप्त करण्यात आली आहेत.
madrasa
madrasa

गुवाहाटी : देशविरोधी कारवायांसाठी जर मदरशांचा वापर होत असेल तर ते उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी दिला आहे. कथीत 'जिहादी' कारवायांसाठी वापरल्या जाणार्‍या बोंगाईगाव इथला मदरसा बुधवारी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल पाडण्यात आला. यानंतर सरमा यांनी हे विधान केलं. (madrassas will be demolished if they are used for antinational activities CM Himanta Sarma warning)

madrasa
नवजात बालकांचं होणार न्युमोनियापासून संरक्षण; Biological E च्या लशीची शिफारस

CM सरमा म्हणाले, "मदरसे उद्ध्वस्त करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. फक्त त्यांचा वापर जिहादी घटकांकडून होत नाही ना हे तपासावं लागेल. मदरशाच्या नावाखाली त्याचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली तर आम्ही ते उद्ध्वस्त करू"

madrasa
MPSC परीक्षेत वायफाय राऊटरचा वापर; उमेदवारावर कायमस्वरुपी बंदी!

दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंध असल्याच्या कारणावरून बोंगईगाव जिल्ह्यातील मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला. अल कायदा आणि अन्सारुल बांग्ला टीम या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल एकूण पाच जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. पूर्वीच्या कारवाईत बारपेटा जिल्ह्यातील एका मदरशात अन्सारुल बांग्ला संघाच्या दोन बांगलादेशी कार्यकर्त्यांना चार वर्षांपासून आश्रय देण्यात आला होता.

madrasa
दुर्गापूजेला मान वाढला, UNESCOच्या यादीत समावेश; ममतांनी काढली आभार रॅली

बोंगईगावच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोलपारा पोलिसांनी मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत मदरशाच्या कॅन्टीनमधून ‘जिहादी’ घटकांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. गोलपारा पोलिसांनी गेल्या आठवड्यात मदरशाच्या एका शिक्षकाला अटक केली, त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता. यावर्षी मार्चपासून राज्यात बांगलादेशींसह ‘जिहादी’ कारवायांशी संबंध असलेल्या ४० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com