Namaz on Road: 'असं का झालं...?' दिल्लीमधील नमाज प्रकरणी कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे..मागवला घटनेचा पूर्ण अहवाल

Delhi Police SI kicking men offering namaz: दिल्लीच्या सराय रोहिल्ला पोलीस ठाण्यांतर्गत इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम व्यक्तींना लाथ मारल्याचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयात 1 मे रोजी सुनावणी होणार आहे
Delhi Police SI kicking men offering namaz
Delhi Police SI kicking men offering namazEsakal

Delhi Police SI kicking men offering namaz: दिल्लीच्या सराय रोहिल्ला पोलीस ठाण्यांतर्गत इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम व्यक्तींना लाथ मारल्याचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयात 1 मे रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भात उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज कुमार मीणा यांच्याकडून घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.

गेल्या शुक्रवारी 8 मार्च रोजी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. गर्दीमुळे काही लोकांनी मशिदीबाहेर रस्त्यावर बसून नमाज अदा करण्यास सुरुवात केल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. हे पाहून पोलिस उपनिरीक्षकाने त्याला लाथ मारून तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

Delhi Police SI kicking men offering namaz
Namaz on Road: दिल्लीच्या नमाज प्रकरणात पोलिसांचं स्पष्टीकरण; पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याचा दावा

या प्रकरणाची पुढील सुनावणी १ मे रोजी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात होणार आहे. या संदर्भात न्यायालयाने इंद्रलोकच्या संबंधित डीसीपींकडून घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. शुक्रवार, 8 मार्च रोजी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक SI कथितपणे मक्की जामा मशिदीजवळ नमाज अदा करणाऱ्या लोकांना लाथ मारताना दिसला. सोशल मीडियावर निदर्शने आणि संतापानंतर 8 मार्च रोजी एसआयला निलंबित करण्यात आले होते; सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.

Delhi Police SI kicking men offering namaz
Namaz on Road: पोलीस अधिकाऱ्याची मॉब लिंचिंग झाली असती; दिल्लीतील घटनेचा नवा व्हिडिओ आला समोर

8 मार्च रोजी इंद्रलोक भागातील एसआय मनोज कुमार तोमर यांनी उत्तर दिल्लीच्या इंद्रलोकमध्ये रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या काही लोकांना धक्काबुक्की आणि लाथ मारल्या होत्या, त्यामुळे शेकडो स्थानिक लोकांनी पोलिसांचा निषेध केला होता. यानंतर आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले. नमाजच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यानंतर लोकांनी खूप विरोध केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com