

Maha Kumbh 2025: प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची अखेर दीड महिन्यानंतर सांगता होत आहे. या काळात तब्बल ६५ कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं. महाशिवरात्रीच्या अंतिम स्नानाच्या पर्वासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्नान करत हा महारेकॉर्ड कायम राखला.