

New Delhi Railway Station stampede : देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले, तर कुंभमेळा निरुपयोगी असल्याचेही त्यांनी म्हटले. ते म्हणाले की कुंभ म्हणजे काय? कुंभमेळा फालतू आहे.