Maha kumbh 2025 : कुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस, पहाटे ४५ लाख भाविकांनी केले पवित्र स्नान
Kumbh Mela : सहा आठवड्यांच्या महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. दर १२ वर्षांनी एकदा महाकुंभ आयोजित केला जातो आणि कुंभमेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. मागील ४४ दिवसांत मेळ्यात ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.
कुंभमेळ्याच्या आज शेवटच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने पवित्र स्नानासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. आज तीन कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, कुंभमेळा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.