
Mamata banerjee comment on Maha Kumbh VIP treatment: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. अलिकडच्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा उल्लेख करून ममतांनी महाकुंभाला 'मृत्यू कुंभ' म्हटले. व्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात आहेत पण गरिबांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोपही ममतांनी केला.