
Tejashwi Yadav Declares Rahul Gandhi as PM Candidate for 2029 : बिहारमधील मतदार यादीच्या सखोल पुनरावलोकनाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये राहुल गांधी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत आणि त्यांना तेजस्वी यादव यांचाही पूर्ण पाठिंबा मिळत आहे . याच पार्श्वभूमीवर १७ ऑगस्टपासून दोन्ही नेत्यांनी महाआघाडीच्या इतर पक्षांसह बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे, जिचा १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे समारोप होणार आहे.
दरम्यान 'मतदार हक्क यात्रे'च्या तिसऱ्या दिवशी आज(मंगळवार) राजद नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना २०२९ मध्ये पंतप्रधान बनवण्याची घोषणा केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, २०२५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होईल आणि २०२९ मध्ये महाआघाडी राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान बनवेल.
तेजस्वी यादव यांच्या या घोषणेनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे की, २०२९ मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला आहे, तर मग बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी किंवा काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ का करत आहे किंवा अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही घोषणा का झालेली नाही?
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात काही अडचण आहे का? की जागा वाटपाच्या मुद्द्यावर राजदकडून अपेक्षित जागा न मिळाल्यास काँग्रेस तेजस्वी यांना पाठिंबा देण्यास टाळाटाळ करत आहे. कारण, लालू प्रसाद यादव यांनी आधीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत आपली अभिलाषा जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे. परंतु काँग्रेसने याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाआघाडीत चर्चा सुरू आहे. आतापर्यंत महाआघाडीच्या नेत्यांच्या पाच बैठका झाल्या आहेत, परंतु कोणत्याही बैठकीत, विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, हे विशेष.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या पण फक्त १९ जागा जिंकल्या. सुमारे २७ टक्के स्ट्राइक रेटसह, काँग्रेसची कामगिरी खूपच खराब होती ज्यामुळे तेजस्वी यादव सरकार स्थापन करू शकले नव्हते, असंही सांगितलं जात आहे. परिणामी असं मानले जात आहे की, यंदा राजद २०२० मध्ये काँग्रेसला जितक्या जागा दिल्या होत्या तितक्या जागा देण्याच्या मनस्थितीत नाही.
२०२५ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील जागावाटपाचा आधार घेतला तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४० पैकी ९ जागा लढवल्या आणि त्या आधारावर पाहिले तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा किमान ५४ जागांवर दावा आहे आणि कदाचित राजदलाही काँग्रेसला तितक्याच जागा द्यायच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.