
Mahak Kranti
esakal
आपल्या देशात असे एक राज्य आहे जिथे प्रत्येक घटकाचा विचार केला जातो. उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'महक क्रांती' या नावाने एक नवीन योजना आणत आहे. मंगळवारी धामी कॅबिनेटने या योजनेला मंजुरी दिली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे राज्यात सुगंधी शेतीला चालना मिळेल आणि 91 हजार लोकांना रोजगार मिळेल.
या नव्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या धोरणांतर्गत पुढील दहा वर्षांमध्ये सुगंधी पिकांचे टर्नओव्हर 100 कोटी रुपयांवरून 1179 कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.