
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा महाकुंभ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या जत्रेचा नजारा पाहण्यासारखा आहे. श्रद्धेच्या या महाकुंभासाठी देश-विश्वातील संत-मुनी येत आहेत. असे काही संत आहेत जे येथे येतात आणि लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात. यातील एक बाबा म्हणजे महाकाल गिरी बाबा जे आपल्या संकल्पामुळे चर्चेत आले आहेत.