Raj Thackeray | 'बृजभूषण यांच्या...', बैठक संपताच मनसेची UP तील आंदोलनावर प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns important meeting at raj thackeray residence shivatirtha over loudspeakers row

'बृजभूषण यांच्या...', बैठक संपताच मनसेची UP तील आंदोलनावर प्रतिक्रिया

मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत. आज मुंबईत ऱाज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंसह अन्य नेते उपस्थित होते. (Raj Thackeray)

सध्या उत्तर प्रदेशात भाजपचे खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी त्यांनी आज मोठी सभा देखील घेतली. ठाकरेंनी उत्तर प्रदेशवासियांची माफी मागावी, मगच अयोध्या दौरा करावा, असं त्यांनी म्हटलं. या दरम्यान, मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. आतापर्यंत झालेल्या सभा आणि अयोध्या दौऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. (Raj Thackeray Holds Meeting On Ayodhya Tour)

हेही वाचा: ''राज ठाकरे दबंग नव्हे उंदीर'', उत्तर प्रदेशातील भाजप नेत्याची टीका

दरम्यान अत्यंत महत्त्वाची बैठक झाली असून पुन्हा अशा बैठका होतील असं ते म्हणाले. तसेच उत्तरप्रदेशमधील एका खासदाराने व्यक्त केलेले मत हे उत्तरप्रदेशचे असून शकत नाही, आमचा आयोध्या दौरा निश्चित आहे असं नांदगावकर बोलताना म्हणाले.

"टोकाची भाषा आम्हालाही बोलत येते पण वेळ काळ पहिली पाहिजे, आता सगळे लोक जागे झालेत, सगळे हनुमान चालीसा म्हणू लागलेत, सगळे आयोध्येला जायला निघालेत. त्यामुळे मनसेने मौन धारण केलं आहे असं ते म्हणाले. शिवसेनेने लावलेल्या पोस्टरवर ते म्हणाले की, "पाहू कोण असली कोण नकली. हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण? हे लवकरंच कळेल. शिवसेनेकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यावाचून पर्याय नाही." असा टोला त्यांनी लावला आहे.

दरम्यान "अयोध्येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच कार्यालय आहे.. तिथे लोक बसतात... कार्यकर्ते तयार होत आहे. त्यामुळे मुंबईत उत्तर भरतीयांसाठी कार्यालय उघडत असेल तर काय हरकत नाही." असं मनसेचे बाळा नांदगावकर माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत.

Web Title: Bala Nandgaonkar Speaks Over Brijbhushan Andolan After Raj Thackeray Meets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top