Maha Kumbh Mela 2025 : पाकिस्तानही झाला महाकुंभचा फॅन ! गुगलवर सर्च करण्याच्या यादीत ठरला अव्वल, नेमकं कारण काय?

Maha Kumbh 2025 Most Searched in World : महाकुंभ २०२५ हा आता जागतिक उत्सव बनला आहे, ज्यात पाकिस्तान, यूएई, कतारसह अनेक परदेशी भक्त सहभागी होत आहेत.
Maha Kumbh Mela 2025 Most Searched in Pakistan
Maha Kumbh Mela 2025 Most Searched in Pakistanesakal
Updated on

Maha Kumbh 2025 Updates : प्रयागराजच्या तीर्थराज संगमावर सोमवारी महाकुंभ मेळ्याचा भव्य शुभारंभ झाला, आणि यंदाचा महाकुंभ केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा उत्सव आता जागतिक पातळीवर पोहचला आहे. इंग्लंड, अमेरिका, ब्राझील, जर्मनी, जापान आणि स्पेनसह अनेक देशांतील भाविक या धार्मिक मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. यामुळे सनातन संस्कृतीच्या प्रभावाचा जागतिक स्तरावर होणारा प्रसार स्पष्टपणे दिसत आहे.

गुगल ट्रेंड्सनुसार, महाकुंभ मेळ्याविषयी पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च केले जात आहे. पाकिस्तानसह यूएई, कतार, बहरीन आणि अन्य इस्लामिक देशांतील लोक कुंभमेळ्याबद्दल सर्च करत आहेत. विशेषतः पाकिस्तान हे देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे लोक मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा आणि त्याच्याशी संबंधित घडामोडींविषयी माहिती शोधत आहेत.

Maha Kumbh Mela 2025 Most Searched in Pakistan
Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळा पौराणिक कथा नाही, तर यामागं दडलंय विज्ञानाचं रहस्य; 99% लोकांना माहिती नाही 'ही' गोष्ट

महाकुंभाच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे आणखी एक उदाहरण म्हणजे, परदेशी भक्तांचे उपस्थिती. भारतातील अनेक शहरांतील भक्तांसोबतच, परदेशी भक्तही या दिव्य अनुभवाचा भाग होण्यासाठी संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. यंदाच्या महाकुंभामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि सिंगापूर यासारख्या देशांतील भाविक सहभागी होत आहेत.

Maha Kumbh Mela 2025 Most Searched in Pakistan
Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाताय? मग 'या' मंदिर, किल्ल्यासह 'या' 5 सुंदर ठिकाणांनाही द्या भेट

महाकुंभ मेळ्यात ३.५० कोटी भाविकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर अमृतस्नान केले. हिंदू धर्माच्या विविध संप्रदायांतील साधूसंतांनी सर्वप्रथम या पवित्र स्नानाचा लाभ घेतला. श्री पंचायती आखाडा, महानिर्वाणी आणि श्री शंभु पंचायती अटल आखाड्याने पहिल्यांदा अमृतस्नान केल्याचे कळाले.

महाकुंभ २०२५ मध्ये संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सनातन धर्माचे अद्भुत दर्शन घडवण्याचा आहे, आणि या भव्य संमेलनात जागतिक पातळीवरील भक्तांचा सहभाग यामुळे एक नवा इतिहास रचला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com