Mahakumbh Kabootar Wale Baba : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक, श्रद्धाळू आणि देश-विदेशातून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या वेगळेपणामुळे अनेक साधु, संत, महंत लक्ष वेधून घेत आहेत. कुणी कठोर तपश्चर्येमुळे तर कुणी वेगळ्या वेशभुषेमुळे, तर कुणी शिक्षणामुळे चर्चेत आहेत. यातच आता कबुतरबाबांची भर पडली आहे. गेल्या ९ वर्षांपासून एक कबुतर या बाबाच्या डोक्यावर घरटं करून आहे. या कबुतरबाबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.