
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत एकूण ९० भाविक जखमी झाले आहेत. योगी सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला . तर ९० जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डीआयजी प्रयागराज मेला यांनी सांगितले की, मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली आहे.