अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचं शव अल्लापूरमधील बांघबरी गद्दी मठाच्या एका खोलित लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गळफास घेत आत्महत्त्या केल्याचं प्रथमदर्शनी म्हटलं जातंय. फोरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच मठामध्ये मोठ्या संख्येने भक्त आणि श्रद्धाळू देखील पोहोचले आहेत.

हेही वाचा: किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केलेलं प्रकरण आहे काय?

शिष्य आनंद गिरीसोबत वितंडवाद

नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य चर्चित योग गुरु आनंद गिरी यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिला आहे. आनंद गिरी यांना आखाडा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पदावरुन काढून टाकलं होतं. तेंव्हा या दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यावेळी अनेक साधू-संत-महंतांनी नरेंद्र गिरी यांचं समर्थन केलं होतं. आनंद गिरी यांनी माफी मागावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

loading image
go to top