

Mahaparinirvan Din
sakal
आज, ६ डिसेंबर, भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे, जो महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय संविधानाचे जनक' म्हटले जाते, कारण ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. संविधान सभेत त्यांच्या योगदानाने लोकशाही आणि सर्वसमावेशक भारताचा पाया घातला. बाबसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.