महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या रंजक गोष्टी

maharana pratap
maharana pratap
Summary

भारत ही शूर वीरांची जन्मभूमी आहे. अशा शूर वीरांपैकी एक आहेत महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्म सोळाव्या शतकामध्ये वीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये झाला

भारत ही शूरवीरांची जन्मभूमी आहे. अशा शूरवीरांपैकी एक आहेत महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचा जन्म सोळाव्या शतकामध्ये वीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये झाला. इंग्रजी कँलेडरनुसार महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 साली कुंभलगड येथे झाला. पण, पंचागानुसार यावेळी महाराणा प्रताप यांची 481 वी जयंती 13 जूनला साजरी केली जात आहे. महाराणा प्रताप यांनी मुघल सम्राट अकबरविरोधात कडवा संघर्ष केला. त्यांनी कधीही अकबरासमोर शरणागती पत्करली नाही. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात...

महाराणा प्रताप कोठेही जाण्याआधी मेवाडची माती आपल्या कपाळावर लावयचे आणि थोडीची माती एका कपड्यात बांधून नेहमी आपल्या जवळ ठेवायचे. १५७२ मध्ये उदय सिंह द्वितीय यांचे निधन झाले. महाराणा प्रताप सर्वात मोठे पुत्र असूनही उदय सिंह यांनी आपले नववे पुत्र जगमालला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं. पण, राज्याच्या मंत्र्यांनी आणि दरबाऱ्यांनी महाराणा प्रताप यांनाच गादीवर बसवलं. त्यामुळे जगमालने रागात मेवाड सोडलं. अकबरने जगमालला जहानपूर जहांगीर दिली होती. महाराणा प्रताप यांनी गादी संभाळण्याआधी १५६८ मध्येच मेवाडची राजधानी चित्तोडवर मुघलांनी ताबा मिळवला होता. गादीवर येताच महाराणा प्रताप यांनी मुघलांची संघर्ष सुरु केला.

maharana pratap
दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेसची 'सारवासारव'

हल्दीघाटचे युद्ध

२१ जून १५७६ ला हल्दीघाटचे युद्ध झाले. अकबरच्या सैन्याचे नेतृत्व राजा मान सिंह करत होता. मुघलांची सैन्यसंख्या कित्येक पटीने जास्त होती. मुघल सैन्य आणि महाराणा प्रतापांच्या सैन्यात भीषण संघर्ष सुरु झाला. युद्धात मान सिंह आणि महाराणा प्रताप समोरासमोर आले. यावेळी मान सिंह हत्तीवरुन लढत होता, तर महाराणा प्रताप आपल्या चेतक घोड्यावर स्वार होते. महाराणा प्रताप यांनी भाल्याने मानसिंहच्या हत्तीला जखमी केलं, पण हत्तीच्या सोंडेला असलेली तलवार चेतकच्या पायाला लागली. चेतक जखमी झाला. मुघलांच्या सैन्याने महाराणा प्रताप यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला. यावेळी महाराणा प्रताप यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना युद्ध क्षेत्र सोडण्याचा सल्ला दिला. अशावेळी जखमी चेतकने वाऱ्याच्या वेगाने महाराणा प्रताप यांना युद्धभूमीबाहेर सुरक्षितस्थळी आणलं. येथेच हृदयविकाराच्या झटक्याने चेतकचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

चेतक घोडा

 महाराणा प्रताप यांचा सर्वात आवडता घोडा चेतक होता. आजही त्याच्या कविता म्हटल्या जातात. महाराणा प्रताप यांच्यासारखाच त्यांचा घोडा चेतक शूर होता. इतिहासानुसार, चेतकने महाराणा प्रताप यांना युद्धभूमीतून सुखरुप बाहेर काढलं होतं. अनेक फूट खोल असलेल्या खड्ड्च्या पलीकडे उडी मारण्याची चेतकची क्षमता होती. युद्धात जखमी झाल्याने चेतकचा मृत्यू झाला. आजही चेतकची समाधी हल्दीघाटमध्ये आहे. चेतकच्या साहसी गोष्टी आजही सांगितल्या जातात.

maharana pratap
लसीकरण रोखण्याची चाल उघड!

हल्दीघाटच्या युद्धानंतर महाराणा प्रताप यांनी आपल्या युद्ध पद्धतीत बदल केला. त्यांनी मुघलांच्या सैन्याविरोधात गनिमी कावा पद्धत वापरण्यास सुरुवात केली. ते मुघलांच्या सैन्यावर हल्ला करायचे आणि नंतर जंगलात जाऊन लपायचे. महाराणा प्रताप यांनी आपले कुटुंब आणि विश्वासू साथीदारांसोबत अनेक काळ जंगलात घालवला. अकबरने आपले सैन्य त्यांच्या मागे सोडले होते. महाराणा प्रताप यांनी मुघलांची रसद तोडणे, रस्ते बंद पाडणे, अचानक मुघल सैन्यावर हल्ला करणे अशा पद्धती वापरल्या. अशाप्रकारे त्यांनी मुघल सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. इतिहासकारांच्या माहितीनुसार, अकबराने अनेकदा महाराणा प्रताप यांच्यासोबत संधी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळी त्यांनी प्रस्ताव नाकारला. राजपूत योद्ध्याने कोणासमोर झुकणे त्यांना मान्य नव्हते. शेवटी देवेरचे निर्णायक युद्ध झाले.

शिकार करताना झालेल्या जखमांनंतर मृत्यू

महाराणा प्रताप यांनी अनेक कवी, कलाकार, लेखकांना आपल्या चानवंद दरबारात आश्रय दिला होता. चानवंद स्कूल आर्टचा विकास महाराणा प्रताप यांच्याच काळात झाला. शिकार करत असताना झालेल्या जखमांमुळे 19 जानेवारी 1597 साली वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा सर्वात मोठा मुलगा अमर सिंह गादीवर बसला. महाराणा प्रताप यांनी मरणशय्येवर असताना आपल्या मुलाला सांगितलं होतं की, 'मुघलांना कधीही शरण जाऊ नको आणि चित्तोर पुन्हा जिंकून घे'. महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला, तेव्हा अकबर लाहोरच्या दरबारात होतो. महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी कळताच अकबराचे शीर झुकलं. त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याचं सांगितलं जातं. अकबराच्या दरबारातील कविंनी यावेळी महाराणा प्रताप यांच्याबद्दल गौरवद्वोर काढले होते.

गनिमी काव्याचे प्रणेते

राजस्थानच नाही तर संपूर्ण भारतात महाराणा प्रताप यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. अनेक लोकगीतांमधून त्यांच्या शौर्य कथा सांगितल्या जातात. आपल्या मातृभूमीसाठी लढणारे आणि शत्रूला कधीही न शरण गेलेले महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले गेले आहे. इतिहासकार सतीश चंद्रा म्हणतात, 'महाराणा प्रतापने बलाढ्य मुघलांचा एकट्याने, कोणाच्याही मदतीशिवाय सामना केला. आपल्या तत्वांसाठी जीव देण्याची त्यांची तयारी होती. महाराणा प्रताप गनिमी काव्याचे प्रणेते होते. त्यांची हीच पद्धत पुढे डेक्कनचा जनरल मलिक अंबर आणि क्षत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबली.' 2007 मध्ये त्यांच्या पुतळ्याचे संसदेत अनावरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com