भारतात कोरोनाचा कहर; तीन राज्यांत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 28 September 2020

मागील 24 तासांतील रुग्णवाढीमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 74 हजार 703 पर्यंत गेली आहे. देशात सध्या 9 लाख 62 हजार 640 कोरोना रुग्ण उपचार (active cases) घेत आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 82 हजार 170 रुग्ण वाढले असून 1 हजार 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णवाढीमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 74 हजार 703 पर्यंत गेली आहे. देशात सध्या 9 लाख 62 हजार 640 कोरोना रुग्ण उपचार (active cases) घेत आहेत. तसेच देशात 95 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील मृत्यूचा दर 1.57 पर्यंत कमी झाला आहे. पण, महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचं दिसत आहे. दिवसें दिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण जवळपास 20 हजारांनी वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 13 लाख 39 हजार 232 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर 35 हजार 571 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकात (Karnataka कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

Corona Updates: देशात आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांनी 60 लाखांचा आकडा पार केला आहे. दररोज देशात 90 हजारांच्या जवळपास कोरोनाच्या नवीन रुग्णांचं निदान होत आहे. विशेष म्हणजे मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. अशातच एक मोठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, देशात आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या (recovery rate of covid 19) 50 लाखांच्या वर गेली आहे. 

Unlock 5 मध्ये कोणते निर्बंध शिथिल होणार? सरकारकडून आज घोषणेची शक्यता

देशात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या दररोज मोठी कमी जास्त होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 7 लाख 9 हजार 394 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशभरात 7 कोटी 19 लाख 67 हजार 230 कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 82.58 वर गेला आहे. हा जगातील सर्वाधिक रिकव्हरी रेट म्हणून गणला जात आहे. 

जागतिक पातळीवर कोरोनाची आकडीवारी पाहिली तर अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त रुग्ण आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 71 लाख 13 हजार 666 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच 2 लाख 4 हजार 750 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत जगभरात 3 कोटी 29 लाख 77 हजार 556 जणांना कोरोनाची बाधा झाली होती.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Andhra Pradesh Tamil Nadu worst affected states by corona in india