india aghadiSakal
देश
Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रातील ‘सुनामी’ने ‘इंडिया’ आघाडीला ओहोटी; काँग्रेसला उंचावलेले मनोधैर्य टिकवता आले नाही
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३१ मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनोबल उंचावले होते.
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीच्या एकूण ऐक्याला व काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागण्याची शक्यता असून दिल्लीच्या राजकारणात भाजपची निवडणूक व्यवस्थापनातील निपुणता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

