NCRB Report : बेरोजगारीमुळं महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide attempts from financial distress

NCRB Report : बेरोजगारीमुळं महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या!

नवी दिल्ली : बेरोजगारीमुळं महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून (NCRB) ही बाब समोर आली आहे. लाजीरवाणी बाब म्हणजे मागील दोन वर्षात देखील आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राच सर्वोच्चस्थानी होता. (Maharashtra at Top in suicides due to unemployment NCRB Shocking report)

हेही वाचा: FIFA World Cup 2022: भारतातही लवकरच होणार 'FIFA'चं आयोजन? PM मोदींची मोठी घोषणा

NCRBच्या अहवालात काय म्हटलंय?

गृहखात्याच्या अतंर्गत येणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा २०१९ ते २०२१ चा देशातील आत्महत्या झालेल्या राज्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र टॉपवर असून सन २०२१ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 22207 आत्महत्या झाल्या आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत 18,925 आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर 14,965 मध्य प्रदेशचा आहे. यामध्ये लाजीरवाणी बाब म्हणजे २०२० मध्ये देखील महाराष्ट्राच आत्महत्यांमध्ये आघाडीवर होता त्यावेळी राज्यात १९९०९ आत्महत्यांच्या नोंदणीकृत घटना होत्या. तसेच सन २०१९ मध्ये १८,९१६ आत्महत्यांसह महाराष्ट्राच सर्वोच्च स्थानी होता.

हेही वाचा: Ravi Rana on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे 'बापू' अन् आदित्य ठाकरे 'पप्पू'; रवी राणांची पुन्हा टीका

तर सर्वाधिक कमी आत्महत्या झालेल्या राज्यांमध्ये नागालँड राज्याचा क्रमांक लागतो. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपमध्ये सन २०२१ मध्ये केवळ एकाच व्यक्तीनं आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे. राज्यांनी पाठवलेल्या आकडेवारीच्या आधारे देशातील सर्व राज्यांचा एकत्रित डेटा NCRBनं जाहीर केला आहे.

हे ही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे..

NCRBच्या अहवालात हे स्पष्टपणे म्हटलं आहे की, राज्यांमधील या आत्महत्या विविध कारणांमुळं झाल्या आहेत, यामध्ये बेरोजगारी हा एक महत्वाचा मुद्दा आहे.