उद्धव ठाकरे 'बापू' अन् आदित्य ठाकरे 'पप्पू'; रवी राणांची पुन्हा टीका : Ravi Rana on Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray_Ravi Rana

Ravi Rana on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे 'बापू' अन् आदित्य ठाकरे 'पप्पू'; रवी राणांची पुन्हा टीका

नागपूर : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर इथं सुरु आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. पण यावरुन आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंचा बापू तर आदित्य ठाकरे यांचा पप्पू असा उल्लेख त्यांनी केला. (Ravi Rana Criticized on Uddhav Thackeray and Aaditya Thackeray due to Maharashtra Assemby Winter Session)

हेही वाचा: Vande Metro: आता 'हायड्रोजन पावर'वर धावणार ट्रेन्स; जाणून घ्या 'वंदे मेट्रो'चा मास्टर प्लॅन?

उद्धव ठाकरेंचं खऱ्या अर्थानं नाव बापू तर त्यांचा मुलगा पप्पू म्हणजे आदित्य ठाकरे. हे देघेही विदर्भाच्या धरतीवर अधिवेशनात आलेले आहेत. मला त्यांची विनंती आहे की हे अधिवेशन पूर्णपणे चालू द्या. कुठल्याही प्रकारचं राजकारण करु नका. तुम्ही कधी इथं अधिवेशन घेतलं नाही, तुमचे मंत्री कधी इथे आलेले नाहीत. तुम्ही विदर्भात थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षांची धूळ साफ करणं गरजेची होती, अशा शब्दांत रवी राणा यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

हेही वाचा: Winter Session: उद्धव ठाकरे नागपूरकडे रवाना; CMपदावरुन पायउतार झाल्यानंतर अधिवेशनात लावणार हजेरी

दरम्यान, उद्धव ठाकरे दुपारी नागपूरमध्ये दाखल झाले, ते दोन दिवसांच्या नागपूरच्या दौऱ्यावर असून उद्या ते हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार आहेत. उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये आगमन झालं त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी त्यांनी हतात 'खरा वारसदार' अशा आशयाचे फलक घेऊन घोषणाबाजीही केली.

हे ही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे..