Mauritius News : मॉरिशसमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ विस्ताराचा शिलान्यास; भारत-मॉरिशस संबंधांना नवी दिशा

मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्ताराचा शिलान्यास; भारत-मॉरिशस मैत्री अधिक दृढ.
Foundation Ceremony Held in Mauritius

Foundation Ceremony Held in Mauritius

sakal

Updated on

महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा नुकताच रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याबाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com