महाराष्ट्र चेंबरची अमेरिकेत व्यापार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india

महाराष्ट्र चेंबरची अमेरिकेत व्यापार परिषद

मुंबई: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर संघटनेतर्फे महाराष्ट्रात अमेरिकेतून गुंतवणुक यावी यासाठी नुकतेच व्यापार परिषदेचे यशस्वी आयोजन केले. त्यामुळे महाराष्ट्र व अमेरीकेदरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्‍वास भारताचे न्युयॉर्क मधील महावाणिज्यदूत रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या व्यापार परिषदेमुळे अमेरिकेतील अनेक उद्योजक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील, असेही जायस्वाल उद्घाटनप्रसंगी म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ व बृहन्महाराष्ट्र मंडळ, अमेरीका यांच्यातर्फे अटलांटीक सिटी, न्यु जर्सी येथे चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष विद्या जोशी, बिझनेस समीट चे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी उपस्थित होते.

या व्यापार परिषदेमुळे महाराष्ट्राशी आमचे ॠणानुबंध आणखी दृढ होतील असा विश्‍वास विद्या जोशी यांनी व्यक्त केला. गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महाराष्ट्र चेंबरच्या योगदानाची माहीती दिली. महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून व्यापारात संयुक्त उपक्रमांसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वात उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी नमुद केले. महावाणिज्यदूत रणधीर जायस्वाल यांनी महाराष्ट्रात नवीन गुंतवणुकीसाठी तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे येणार्‍या प्रस्तावांच्या स्विकृतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

जगभरातील विविध देशात राहणार्‍या महाराष्ट्रीय लोकांच्या संघटनांचे एक सामुहीक व्यासपीठ, ग्लोबल महाराष्ट्र फोरम या नावाने स्थापन केल्याची घोषणा ललित गांधी यांनी केली. या फोरम चे औपचारीक उद्घाटन जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित विविध उपक‘मांमध्ये अमेरीकेतील विविध राज्यातुन आलेल्या पाच हजारांहून अधिक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध प्रस्तांवावर चर्चा करण्यात आली व विविध उद्योजकांच्या बैठका झाल्या.

Web Title: Maharashtra Chamber Trade Conference America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaamericaBusiness