
पहलगाम हल्ल्याच्या आधी तिथं एका पर्यटनासाठी आलेल्या वृद्ध महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. आता ही घटना उघडकीस आली असून अनंतनाग जिल्हा न्यायालयात या प्रकरणी ३० जून रोजी सुनावणी झाली. पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या ७० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. महिला पहलगामला फिरायला गेली असताना ११ एप्रिलला हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी झुबैर अहमद नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलंय.