महाराष्ट्र कन्या हर्षिनी झळकणार नेटफ्लिक्सवर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माहिती प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या विषयांवरील २५ लघुपट प्रसारित केले जाणार आहेत.
Harshini Kanhekar
Harshini KanhekarSakal
Summary

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माहिती प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या विषयांवरील २५ लघुपट प्रसारित केले जाणार आहेत.

नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माहिती प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या विषयांवरील २५ लघुपट प्रसारित केले जाणार आहेत. या मालिकेत देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी असलेल्या नागपूरच्या हर्षिनी कण्हेकर, पद्म विजेत्या पिठोरागड येथील पर्यावरण संरक्षक बसंती देवी आणि एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक अंशू जाम्सेन्पा यांच्या यशोगाथांच्या लघुपटांचा समावेश असेल.

माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘आझादी की अमृत कहानियां’ नावाच्या लघुपटांचे आज प्रकाशन केले. यावेळी हर्षिनी कण्हेकर, बसंती देवी आणि अंशू जाम्सेन्पा यांना गौरविण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेटफ्लिक्सच्या सहकार्याने माहिती प्रसारण मंत्रालयाने विविध विषयांवरील लघुपट मालिका लोकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवरील दोन दोन मिनिटांचे २५ लघुपट हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, बंगाली, तमीळ, मल्याळम या भाषांमधून दूरदर्शनसह सोशल मीडियावर प्रसारित केले जाणार आहेत. या लघुपटांच्या पहिल्या संचाचे प्रकाशन आज झाले. यामध्ये हर्षिनी, बसंती देवी आणि अंशू यांचे अनुभव कथन असलेली चित्रफीत तसेच मालिकेचे संक्षिप्त दर्शन घडवणारा लघुपटही दाखविण्यात आला.

या यशोगाथांमध्ये पूनम नौटियाल, डॉ. टेसी थॉमस, तन्वी जगदीश, आरोही पंडित यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला आहे. पूनम नौटियाल या आरोग्य सेवा कर्मचारी असून उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात सर्वांचे लसीकरण करण्यासाठी मैलोनमैल चालत गेल्या. तर, डॉ. टेसी थॉमस या भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. तन्वी या भारतातील पहिल्या स्टँड-अप पॅडलबोर्डर स्पर्धक असून आरोही पंडित या लाइट स्पोर्ट विमानातून अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर एकट्याने ओलांडणाऱ्या जगातील सर्वात तरुण आणि पहिली महिला वैमानिक आहेत.

प्रसारण मंत्रालयाची नेटफ्लिक्सशी भागिदारी

प्रकाशनाच्या वेळी मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की आझादी की अमृत कहानिया हा असा प्रयत्न आहे, ज्याद्वारे प्रेरणा स्रोत असलेल्या महिलांच्या यशोगाथेचा उत्सव साजरा केला जाऊ शकेल. तर, ग्लोबल टिव्ही, नेटफ्लिक्सच्या प्रमुख बेला बजारिया यांनी सांगितले, की भारताच्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्यासाठी नेटफ्लिक्सने माहिती प्रसारण मंत्रालयाशी भागीदारी केली असून याअंतर्गत नेटफ्लिक्स भारतातील असामान्य व्यक्तींच्या जीवनावर आधारित लघुपटांची मालिका बनवित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com