esakal | काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ची आज बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

ncp-congress

महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची  आज (ता. २०) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल.

काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ची आज बैठक

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी आता दिल्लीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची  आज (ता. २०) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावित मसुद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा मसुदा गुरुवारी शिवसेनेला सोपविला जाणार असून, पुढील आठवड्यात सरकार अस्तिवात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल शिवसेनेबाबत केलेल्या विधानांमुळे गोंधळ वाढला होता. आज मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेबाबत समन्वय होता. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवरून काँग्रेसच्या अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, तसेच के. सी. वेणुगोपाल दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटले. उद्या पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बोलणी होणार असल्याने त्यासंदर्भातील ही भेट होती, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांशी भेट घेऊन चर्चा केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील प्रस्तावित सरकारच्या रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे. सरकार पाच वर्षे टिकावे आणि यानिमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत होणारी मैत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राहावी, असा प्रयत्न दोन्हीही काँग्रेसचा असेल. वादग्रस्त मुद्द्यांवर निर्णय करण्यासाठी सुकाणू समिती बनविणे यावरही बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

असे असेल संभाव्य वेळापत्रक
    गुरुवारी (ता. २१) काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापनेचा मसुदा शिवसेनेकडे सोपविणार
    शिवसेनेकडून या मसुद्यावर शुक्रवारपर्यंत उत्तर अपेक्षित
    मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या, खातेवाटप, विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे, यावर रविवारपर्यंत निर्णय अपेक्षित