
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करीत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स प्रकारात पाच सुवर्णपदकांसह एकूण १२ पदकांची लयलूट करीत मंगळवारचा दिवस गाजवला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रिदमिक जिम्नॅस्टिक्स ओव्हर ऑल प्रकारात मुंबईची परिना मदनपोत्रा हिने ८३.६५० गुणांसह सुवर्ण जिंकले, तर मुंबईच्याच शुभश्री मोरे हिने ८०.२०० गुणांसह रौप्यपदक पटकावले. दिल्लीच्या राचेल दीपला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.