coronavirus india update | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची केंद्राला चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india update

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची केंद्राला चिंता

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक सक्रिय रूग्ण आढळत असून ही चिंताजनक परिस्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांत केंद्रीय पथके पाठविण्यात आली असून चाचण्या आणि लसीकरण या दोन्हींचे प्रमाण तत्काळ वाढविण्याची सूचना या राज्यांच्या आरोग्य यंत्रणांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत गेला, ही चिंताजनक बाब असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. (coronavirus india update)

हेही वाचा: पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?

मागील चार दिवसांत देशात नवीन रूग्णसंख्या वाढली असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू याबरोबरच दिल्ली, केरळ व उत्तर प्रदेशातही रूग्ण व पॉझिटीव्हिटी दर लक्षणीयरीत्या वाढला आहे. केंद्रीय यंत्रणा या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्यांना आवश्यक ती मदत तत्काळ दिली जात आहे. कोणत्याही राज्याकडे लशींची कमतरता नाही. महाराष्ट्रासह ११ राज्यांत ५० हजारांहून जास्त आणि १३ राज्यांत १० ते ५० हजारांच्या दरम्यान सक्रिय रूग्ण आढळत आहेत. १२ राज्यांत १० हजारांपेक्षा कमी सक्रिय रूग्ण आहेत. १२ जानेवारीनंतरच्या ८ दिवसांत देशातील ३३५ जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी दर पाच टक्क्यांवरून वाढून सव्वापाच टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचा: पुणे : बंद सीसीटीव्हीकडे पुणे महापालिका अन पोलिसांचेही दुर्लक्ष

मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत मृत्यूमुखी पडणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, याकडे आरोग्य मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. भूषण यांच्या म्हणण्यानुसार, ३० एप्रिल २०२१ रोजी तीन लाख ८६ हजार ४५२ रूग्ण आढळले होते, तेव्हा देशात ३०५९ जणांचा मृत्यू झाला होता. आज २० जानेवारीला तीन लाख १७ हजार ५३२ नवीन रूग्ण आढळले तेव्हा ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाला वेग मिळाल्याने देशात मृत्यूंचे प्रमाण यावेळेस कमी आढळते असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Maharashtra Karnataka Tamil Nadu Growing Coronavirus India Update Number

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top