देशात रुग्णसंख्या पुन्हा वाढली; केरळात कोरोना विस्फोट

child corona
child coronasakal media
Summary

आरोग्य मंत्रालयाने (health ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 625 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ते जास्त आहेत.

नवी दिल्ली- देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ (india corona updade today ) पाहायला मिळाली आहे. आरोग्य मंत्रालयाने (health ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 625 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ते जास्त आहेत. मंगळवारी देशात 30 हजार 549 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजची वाढ चिंताजनक आहे. नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत केरळ (kerala ) राज्याचा हिस्सा मोठा आहे. एकट्या केरळ राज्यात 23 हजार 676 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (India corona update today news)

एका दिवसात 36 हजार 668 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 10 हजार 353 रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.29 टक्के आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 9 लाख 33 हजार 22 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. भारताचा सध्याचा रिकव्हरी रेट 97.37 टक्के आहे. देशात आतापर्यंत 48.52 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

child corona
HSC RESULT : राज्यभरातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीत!

केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट

केरळ राज्यात कोरोना विषाणूचा विस्फोट झाला आहे. एकट्या केरळमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी केरळ राज्यात 23 हजार 676 नव्या रुग्णांची नोंद झालीये, त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 34.49 लाख झाली आहे. दिवसभरात कोरोनामुळे 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण मृतांची संख्या 17 हजार 103 झाली आहे.

child corona
MPSC नियुक्त्यांबाबतची फाईल मिळाली उशीरा; राज्यपालांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात दिवसभरात 6 हजार 005 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या 63 लाख 21 हजार 068 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 74 हजार 318 इतकी झाली. राज्यात 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 33 हजार 215 वर पोहोचला आहे. दिवसभरात 6 हजार 799 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 10 हजार 124 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के एवढे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com