Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra  IMD heavy Rain Alert

Maharashtra  IMD heavy Rain Alert

esakal

Updated on

IMD heavy rain alert : महाराष्ट्रात पुढचे ७२ तास महत्वाचे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com