दिवसभरात राज्यात अन् देशात घडलेल्या संपूर्ण घडामोडी जाणून घ्या, एका 'क्लीक' वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात राज्यात अन् देशात घडलेल्या संपूर्ण घडामोडी जाणून घ्या, एका 'क्लीक' वर

दिवसभरात राज्यात अन् देशात घडलेल्या संपूर्ण घडामोडी जाणून घ्या, एका 'क्लीक' वर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. . राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच राज्याच्या राजकारणात ही मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज राज्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याचबरोबर अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत एका क्लिकवर.  

भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू करावी; काँग्रेस नेते शशी थरूर

शशी थरुर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून भाजपला आव्हान दिलं आहे. की 2024 च्या निवडणुकीनंतर भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू करावी. कारण 2024च्या निवडणूकीनंतर त्यांना तिथेच बसावे लागणार आहे.

आता बास अति होतंय, उद्धव ठाकरे चिडले! 

शिवसेनापक्ष प्रमुख म्हणून होण्याचा प्रयत्न केला जातोय. याचे वाईट वाटते. आपला मेळावा होऊ नये म्हणूनही काही जणांनी प्रयत्न होते. एकीकडे पंचतारांकितपणा होता. दुसरीकडे आपले साधे शिवसैनिक होते. आम्ही काहीही ठेवलं नव्हतं. माझ्या शिवसेनेसाठी मी काहीही करेल असा विचार करुन ते मेळाव्यासाठी आले होते.

ठाकरे-शिंदे संघर्षात आणखी एक नाव गोठवलं जाणार?

शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी ठाकरे गटानं केलीय. परंतु तेच नाव शिंदे गटालाही हवंय. दोन्ही गटानं एकाच नावाची मागणी केल्यानं हे नावही गोठवण्यात येण्याची शक्यता आहे.

'धनुष्यबाण' गोठवल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यामध्ये त्यांनी धनुष्यबाण प्रकरणावर न बोलण्याचे सांगितले आहे. राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना थेट संपर्क केला. प्रवक्त्यांनादेखील या विषयावर आता बोलता येणार नाही. राज्यातील कार्यकर्त्यांना मेसेजद्वारे या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हिंगोलीत एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शनिवारी) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर हिंगोलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला आहे.

नाशिक अपघातातील तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ जणांची ओळख पटली

नाशिक शहरात काल झालेल्या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची प्रक्रिया अडचणीची होती. मृत व्यक्तींचे शरीर पूर्णतः जळून खाक झाले होते. डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी आठ मृतांची ओळख पटली असून तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पक्षाच्या नावासाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ‘हे’ 3 पर्याय सादर?

ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये  शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे अशी माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार

राजकीय घटनांचा क्रम चालू असतानाच उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वा. संवाद साधणार आहेत. राज्यातील जनतेशी उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय बोलतील? कोणत्या गोष्टी जनतेसमोर मांडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चिन्ह गोठवल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि राणे यांची भेट 

निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. राणे आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे आणखी गुलदस्त्यात आहे.

दोन्ही गटांकडे उद्यापर्यंतचा वेळ; कोणतं चिन्ह निवडणार याकडे राज्याचं लक्ष 

शिवसेनेचा ठाकरे गटाकडून त्रिशूळ उगवता सूर्य आणि मशाल असे पर्याय मागण्यात आल्याची चर्चा आहे. काल आलेल्या आदेशात आयोगाच्या चिन्हांची जी यादी आहे त्यातूनच हे चिन्ह निवडावे लागणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या चिन्हांचा यादीत अशी चिन्ह नाहीयेत. त्यामुळे सेनेला यादीत नसलेली चिन्ह कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना आमची म्हणणाऱ्यांनी आईला बाजारात विकलं – किशोरी पेडणेकर

शिवसेना आमची आहे, असं सागणाऱ्यांनी आईला बाजारात विकलं असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. आम्ही खचणार नाही, घाबरणार नाही, शिवसेना पक्ष नव्हे एक कुटुंब असं पेडणेकर यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना संपवण्याचा प्लॅन शरद पवारांचा; विजय शिवतारेंचा मोठा गौप्यस्फोट

2014 पासुन शरद पवार यांचा प्लॅन शिवसेना संपवण्याचा होता. शरद पवार याचं कटकारस्थान आहे आणि त्यांच्या नादी लागून उध्दव ठाकरे यांनी पक्ष संपवला आहे अशी जहरी टीका शिवतारे यांनी केली आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होत की, 2014 ला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणं ही माझी राजकिय खेळी होती असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे.

पुण्यात भाजपकडून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याची राहुल गांधी यांची लायकी नाही, भाजपची राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. याविरुद्ध पुण्यात भाजपकडून आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याची लायकी राहुल गांधींची नाही अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी त्यांची आजी, आजोबा कुठे राहतात ते बघावं आणि मग सावरकर यांच्या बद्दल बोलावं. भारत जोडो यत्रचे ते नाटक करत आहेत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

LIVE Update: ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक, पुढील रणनीती ठरवणार!

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता पुढील निर्णय येईपर्यंत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. सोबतच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आज बारा वाजता उद्धव ठाकरे गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पक्षाची पुढील रणनीती ठारवली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेला - शरद पवार 

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेला तर योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्री नाही. शिवसेना संपणार नाही, आता पक्ष अधिक जोमाने वाढेल. मविआ कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर चंद्रकांत खैरे यांची संतप्त प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीसांचे आहे असा आरोपही खैरे यांनी केला आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल आणि एकनाथ शिंदे कुठेच दिसणार नाहीत असंही खैरे यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांकडून नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारपर्यंत नवे चिन्ह आणि नवे नाव देण्याच्या सूचना दोन्ही गटांना देण्यात आली आहे. अशातच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट केला आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? अश्या चर्चेला उधाण आलं आहे.

देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला - वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. .