राहुल गांधीची डोकेदुखी वाढली; अनेकांचा निवडणुक लढण्यास नकार

मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेकांनी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. 

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोकेदुखी वाढवत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह अनेकांनी लोकसभा निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. 

राज्यातील जवळपास आठ ते दहा मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नकारामुळे राहुल गांधी यांना मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागणार आहे. 2014मध्ये मोदी लाटेत राज्यातील 48 पैकी काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यात विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून तर राजीव सातव यांनी हिंगोलीतून विजय मिळवला होता. यातील अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोघेही लोकसभा निवडणुक लढवण्यास अनुत्सुक आहेत. चव्हाण आणि सातव या दोघांनीही निवडणुक लढवण्यासाठी अनुत्सुक असल्याचे पक्ष नेतृत्वाला कळवले आहे.

त्याचबरोबर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री मिलींद देवरा, प्रिया दत्त, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासोबत आणखी काहीजण निवडणुक लढवण्यास अनुत्सुक असल्याने राहुल गांधींची डोकेदुखी वाढल्याची चर्चा सध्या काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra leaders of congress do not want to contest lok sabha election