Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सत्तारांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची जाहीर सभा

सत्तारांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाद वाढतचं चाललेला आहे. दरम्यान या सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार पाहावं लागणार आहे.

पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी

पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत आहे.

अमरावतीच्या पिंपळविहीर येथे एसटी बसला आग

माटुंगा येथे चारचाकी गाडीला आग

माटुंगा येथे चारचाकी गाडीला आग लागल्यामुळे रस्त्यावर

भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची तयारी

राहुल गांधी दिवसाला पंचवीस किमी चालतात. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहूल गांधी यांच्या सोबत चालण्याची आणि स्टमीना टिकवण्यासाठी व्यायाम करत आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ,बाळासाहेब थोरात चालण्याची प्रॅक्टिस करत आहेत.

बच्चू कडू आणि माझा वाद संपलाय- रवी राणा

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर बच्चू कडू आणि माझा वाद संपलाय असं रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट: ५ ते ८ कामगारांचा मृत्यू

जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत भट्टीचा आज भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेत 6 कामगार जखमी झाले आहे. तर, दोन जण गंभीर आहेत. जखमींना औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सत्ता गेली चुलीत- बच्चू कडू

बच्चू कडू यांनी आज मेळावा घेवून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले सत्ता गेली चुलीत.

मी कधीच राजकारणासाठी दिव्यांगांचा वापर केला नाही.

आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, आमच्या वाटेला आलेल्यांचा कोथळा बाहेर काढतो.

आम्ही २०१४ ला शरद पवारांना पाठिंबा दिला होता.

जे बंडंखोर आहेत तेच पहिल्या पंगतीत बसलेत.

या पुढं आमच्या वाट्याला गेल्यावर माफ करणार नाही, पहिली वेळ माफ करतो.

रवि राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू एक पावूल मागे.

पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र

पुण्यात पालिका विरुद्ध पुणे पोलीस सामना सुरुच आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती. मात्र, ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्तांनी पालिकेलाच सल्ला दिला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करायची, असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा. अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावेत,असे पत्रच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे. नगर रस्ता, सातारा रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. शहरात दिवाळीच्या आठवडाभर आधी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ऐन दिवाळीतही हीच स्थिती होती. त्यावरून कोंडी फोडण्यासाठी या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने दिलेल्या पत्र जिव्हारी लागलेल्या पोलिसांनी आता थेट पालिकेला पुन्हा पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ

पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. 15 जिवंत काडतुसे यांच्याबरोबर धारधार शास्त्र देखील आढळून आली आहेत. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाले साफ करताना ही जिवंत काडतुसे आणि शस्त्राने भरलेली पिशवी आढळली आहे.

पुण्यात बर्निंग बसचा थरार

पुण्यातील येरवडा शास्त्रीचौकात शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. यवतमाळ ते चिंचवड या एस टी विभागाच्या शिवशाई बस ने पेट घेतला. गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक घेतला पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

दिल्लीत नरेलामधील प्लॅस्टिक कारखान्याला आग

दिल्लीत नरेलामधील प्लॅस्टिक कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. कारखान्यात लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या आगीमद्धे दोघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात भाडणं सोडवणाऱ्या महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते मात्र तिथे एका इसमांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा बायकोचे भांडण सोडवत असताना पतीचा राग अनावर झाला आणि त्याने थेट महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली व पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घातला.

दिवाळीच्या दिवसात पुण्यात चोरट्यांनी घरफोड्या करत लंपास केले 52 लाख रुपये

दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक फ्लॅट, दुकाने बंद होती याचाच फायदा या चोरट्यांनी उचलला आणि ८ दिवसात १२ हून अधिक घरफोड्या पुण्यात झाल्या आहेत. शहरात ऑक्टोबर २३ ते ऑक्टोबर २९ दरम्यान शहरात १२ हून अधिक घरफोड्या करत चोरट्यांनी ५२ लाख रुपये पळवले आहेत. बंद फ्लॅट नव्हे तर दुकानांना देखील चोरट्यांनी टारगेट केले होते. १२ घरफोड्या मध्ये मात्र अद्याप एकाही आरोपीला पोलिसांकडून अटक झालेली नाही.

शिंदे-ठाकरे गटाला चार आठवड्याची मुदत; पुढील सुनावणी चार आठवडयानंतर

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात झाली. यावेळी दोन्ही गटांना 4 आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. आता पुढील सुनावणी 4 आठवडयानंतर होणार आहे.

शेअर बाजारात उत्साह, खरेदीचा जोर, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार

आज शेअर बाजारात सेन्सेक्स 344 अंकाच्या तेजीसह 61,083 वर सुरू झाला तर निफ्टी 108 अंकाच्या तेजीसह 18,120 वर सुरू झाला. आज सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तब्बल ४० दिवसांनंतर प्रकरण आज न्यायालयाच्या कामकाजात पहिल्या क्रमांकावर घेण्यात आलं आहे. त्यामुळं आज सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची घातला हैदोस

इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या हीच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस घातला आहे. मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा प्रेक्षकांनी केला तर प्रेक्षक झाडावर बसल्याने झाडे देखील मोडली आहेत.

सीटबेल्ट संदर्भात आजपासून नाही तर 11नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई होणार

मुंबईत अनेक कारचालकांनी अजूनही मागच्या सीटवर सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिला जाणार असून 11 नोव्हेंबर पर्यंत सीटबेल्टकरता मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग

पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहे. आग इतकी भीषण की टेरेस मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष

आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :crimerailwayTraffic