
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा
उद्धव ठाकरे बोहरा समाजाच्या धर्मगुरुंच्या भेटीला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब बोहरा समाजाचे धर्मगुरुंच्या भेटीला गेले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.
पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार.
राज्यात ‘पीएम श्री’ योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार.
धान शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.
यमुनानगर येथील फर्निचरच्या दुकानाला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस.
सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली
राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. उद्या पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्यात आला. राज्याच्या हिताचे निर्णय घेतल्याने कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यापर्यंत लांबण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयामध्ये आज राज्यातील सत्तासंर्घावर सुनावणी होत आहे. ही सुनावणी उद्यापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्रेकनंतर पुन्हा सत्तासंघर्षावर युक्तिवादाला सुरूवात
ब्रेकनंतर पुन्हा सत्तासंघर्षावर युक्तिवादाला सुरूवात झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज रायगडमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
जेवणाच्या वेळेनंतर पुन्हा थोड्याच वेळात युक्तिवादाला सुरूवात होणार
रबिया प्रकरणावरुन महाराष्ट्राचा निर्णय नाही- न्या. चंद्रचूड
तथ्य तपासून निर्णय देणार- न्या. चंद्रचूड
रबिया प्रकरणावरुन महाराष्ट्राचा निर्णय नाही- न्या. चंद्रचूड
शिंदे गटांकडून निरज कौर युक्तीवाद करणार
हरीश साळवे ऑनलाइन सहभागी झाले आहेत
बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगाचे छापे
बी बी सी च्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगाचे छापे पडले आहेत. या कारवाई दरम्यान आधिकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीमध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता.
निवडून आलेलं सरकार चुकीचे नियम वापरुन पाडलं गेलं - कपिल सिब्बल
नवाब रेबिया आणि या प्रकरणाची आम्ही थेट तुलना करत नाही - सुप्रीम कोर्ट
मागील 8 महिन्यात कोणताही निर्णय झाला नाही - कोर्ट
कपिलसिब्बल यांच्याकडून 10 सूचीच वाचन सुरू
तथ्य तपासून निर्णय देणार - न्यायमूर्ती चंद्रचूड
तथ्य तपासून निर्णय देणार न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हंटलं आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
नबाम रेबिया प्रकरणात उपाध्यक्षांचा निर्णय कोर्टाने रद्द केला
राज्यपालांचा निर्णय कोर्टाने रद्द केला
अनेक आमदारांच्या पक्षांतरांमुळे नवीन सरकार स्थापन करावं लागलं
राजकीय सभ्यता कायम राहण्यासाठी दहावी सूची दिली आहे.
या दहाव्या सूचीचा गैरवापर होतोय की काय अशी शंका आहे.
सध्या अनेक सदस्यांविरोधात आपत्रतेची कारवाई होत आहे.
सदन सुरू असतानाच अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला जावा.
तसं न झाल्यास लोक मनाप्रमाणे सरकार पडतील
म्हणूनच सदन सुरू असतानाच नोटिस आणि पुढील 7 दिवसांत निवडा व्हावा
अधिवेशन सुरू नसताना उपाध्यक्षांना अविश्वासाची नोटिस
पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात
मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या ट्रक ने समोर असलेल्या दहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे. हा अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात काही जण किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरु आहे.
नवाब रेबिया प्रकरणात राज्यपालांचा अधिकारावर प्रश्नचिन्ह
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचा रूट मार्च
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठला ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसबा विधानसभा मतदारसंघात हा रुट मार्च काढला होता
काय आहे नबाम रेबिया प्रकरण?
2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना अरुणाचल प्रदेशचे बरखास्त केलेले मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पुन्हा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. ज्यामध्ये न्यायालयाने काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांचा निर्णय कायम ठेवला होता. ज्या अंतर्गत त्यांनी विधानसभा अधिवेशन जानेवारी 2016 ऐवजी डिसेंबर 2015 मध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला होता. 2016 मध्ये, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी राज्यपालांना 14 जानेवारी 2016 रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी एक महिना आधी 16 डिसेंबर 2015 रोजी अधिवेशन बोलावले होते. त्यामुळे घटनात्मक संकट निर्माण झाले. तुकी यांनी विधानसभेच्या इमारतीला कुलूप लावले आणि राज्यपालांच्या या निर्णयाला विधानसभा अध्यक्ष रेबिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
5 जानेवारी 2016 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि सभापतींची याचिका फेटाळून लावली होती. 15 जानेवारी 2016 रोजी सभापतींनी राज्यपालांच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात याचिका दाखल केली होती. 29 जानेवारी 2016 रोजी नबाम तुकी यांनी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 30 जानेवारी 2016 रोजी केंद्राने अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट कायम ठेवली होती. राज्यातील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा युक्तिवादही केंद्राने केला होता.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू
अध्यक्षाऐवजी राज्यपालांनी तारखा बदलून अधिवेशन बोलावलं होतं.
आमदारांनी तेव्हा पक्षातल्या भ्रष्टाचाराच पत्र दिलं होतं.
विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती असू नये - कपिल सिब्बल
विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती असू नये असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हंटलं आहे. तर अध्यक्ष आपल्या पक्षाला सहकारी करत असतात असंही सिब्बल म्हणालेत. तर पदमुक्त झाल्यानंतर अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत.
दोन्ही बाजूकडून युक्तिवाद सुरू आहे
शिंदे गटकडून हरिश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.
ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे.
शिंदे गटकडून हरिश साळवे यांचा युक्तिवाद सुरू
राज्यातील सत्तासंघर्षाच्या महत्वपूर्ण सुनावणीला सुरवात
राज्यातील सत्तासंघर्षाच्या महत्वपूर्ण सुनावणीला सुरवात झाली आहे. शिंदे गटकडून हरिश साळवे यांचा युक्तिवाद सुरू
मुंबई सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्टेशन परिसरात आग
मुंबई सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्टेशन परिसरातील प्रभादेवी येथील निर्माणाधीन मेट्रो स्टेशन परिसरात आग लागण्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णयही घेण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तासंघर्षात आज महत्वपूर्ण सुनावणी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं.यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 3 जणींचा मृत्यू
पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर