Marathi News Update: शिवसेना-भाजप युतीमध्ये राडा ते कर्नाटक सरकारच्या अडचणीत वाढ, दिवसभर काय घडलं?

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal

कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राहुल गांधींना मानहानीच्या खटल्यात समन्स

मानहानीच्या खटल्यात विशेष कर्नाटक न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना समन्स बजावले.

भाजपचे प्रदेश सचिव एस केशवप्रसाद यांनी ९ मे रोजी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवर गुन्हा दाखल केला होता.

दमण डीसी जनरल/सब डीएम यांनी कलम 144 जारी केले आदेश

दमण डीसी जनरल/सब डीएम यांनी सीआरपीसीच्या कलम 144 अन्वये एक आदेश जारी केला आहे ज्यात समुद्रकिनारे, विहार आणि किनार्‍याजवळील इतर ठिकाणी लोकांच्या हालचालींवर बंदी आहे.

नितीन अग्रवाल यांनी बीएसएफचे नवे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

बिपरजॉय वादळापूर्वी गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कच्छमध्ये सायंकाळी ५.०५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती.

बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून दूर, मात्र...; आयएमडी प्रमुखांची महत्त्वाची माहिती

बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून दूर आहे. चक्रीवादळ पोरबंदर 300 किमी अंतरावर आहे. बिपरजॉय 15 जून रोजी दुपारी मांडवी आणि कराची दरम्यान उतरण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत कच्छ, सौराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल: सुनील कांबळे, आयएमडी प्रमुख, मुंबई

राज्यात ६ ठिकाणी शिवसृष्टी, शिवकालीन थिम पार्क उभारणार - पर्यटनमंत्री

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक या ६ ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येणार आहेत.

पर्यटन विभागाकडून मार्फत उभारल्या जाणाऱ्या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तसेच वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यासाठी ७० कोटींची तरतूद केली आहे अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी पत्रपरिषदेत दिली.

विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून...; CM शिंदेंनी स्वीकारलं महापूजेचं निमंत्रण

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण आज मला देण्यात आले. विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा आषाढी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करण्याचे भाग्य मला मिळाले असून या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार करून या पूजेसाठी अवश्य उपस्थित राहू असे सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच पारंपरिक वारकरी पगडी आणि वीणा देऊन मला सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा देखील आदरपूर्वक स्वीकार केला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेच्या सदस्या ऍड.माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे उपस्थित होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे.

युतीमध्ये समन्वय समिती स्थापन करणार- शंभुराज देसाई

दोन्ही गटातील मिटण्यासाठी युतीमध्ये समन्वय समिती स्थापन करणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

शिंदे फडणवी तुलना अचंबित करणारी - बावनकुळे

काल जाहिरातीवरून काही कार्यकर्त्यांच मन तुटलं. देवेंद्र फडणवीसांनी लाखो कार्यकर्त्यांना घडवलं आहे. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांच्या मनाल ठेस पोहचली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना केली हे थोडंस अचंबित करणारं होतं.त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्वभाविक आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

जगतगुरू तुकोबारायांची पालखी हडपसरला पोहचली

जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी पहाटे पुण्यातून मार्गस्थ झाली. पुलगेट, भैरोबानाला, फातिमानगर, रामटेकडी, मगरपट्टा चौक मार्गे गाडीतळ परिसरात बारा वाजता हडपसर येथे दुपारच्या विसाव्यासाठी पोचली. विसाव्या च्या ठिकाणी हडपसर ग्रामस्थ भजनी मंडळ सकाळी साडे नऊ पासून वाजल्यापासून भजन करीत होते.

कला संस्कृतीच्या ग्रुपने रांगोळ्यांचा पायघड्या अंथरल्या होत्या. भगव्या पताका लावल्या होत्या. पालखी येण्यापूर्वी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पाऊणे वाजता चौघडा आला. सव्वा बारा वाजता पोचला. खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, व हडपसर ग्रामस्थांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली. अन विसाव्याच्या चौथऱ्यावर ठेवली. स्थानिकाच्या दर्शनाची बारी सुरू झाली.

शक्तिकांत दास 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंगद्वारे गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विदर्भातील  लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी राष्ट्रवादीची आज बैठक

विदर्भातील लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेघाली राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील, वळसे पाटील उपस्थित असणार आहेत. याचवेळी गडचिरोली, वर्धा, अमरावती, रामटेक या मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती - रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरून देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत, "इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय... यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?" असं म्हटलं आहे.

तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या कारवाईचा कांग्रेसकडून निषेध

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांना अंमलबजावणी संचालनालयाने रात्री उशिरा केलेल्या अटकेचा निषेध केला आहे. हा राजकीय छळ आणि विरोध करणाऱ्यांविरोधात मोदी सरकारचा सूडभावना असल्याचे खर्गे म्हणाले आहेत. विरोधी पक्षातील कोणीही अशा प्रकारांना घाबरणार नाही असेही खर्गे म्हणाले आहेत.

शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस, बाळासाहेबांचे फोटो

शिवसेनेने सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या दोघांचा फोटो आहे. तर वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी, आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com