दिवसभरात घडलेल्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifiction

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

अनिल देशमुखामनां दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआय न्यायालयाने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.

सरकार पडल तरी चालेल मात्र शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे

एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह पुन्हा एकदा 21 नोव्हेंबरला गुवाहाटीला घेवून जाणार आहेत. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व आमदार जात आहेत, ते मी पण जाणार आहे. आम्ही सर्वांनी मिळून कामख्या देवीला नवस केला होता म्हणून सरकार आलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी सरकार पडल तरी चालेल मात्र शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे अशी भावना देखील त्यांनी बोलून दाखवली. त्यांमुळं सरकारमधील आमदार नाराज असल्याचे बोलले जाते.

राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंचा पहिल्या स्मृतिदिन केले अभिवादन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २० नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या प्रथम चरणाचा लोकार्पण सोहळ्याला अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील नवीन पोलिस उपयुक्त यांना देण्यात आलेले झोन

संदीप सिंह गिल्ल, (पोलिस उपायुक्त झोन १)

स्मर्तना पाटील, (पोलिस उपायुक्त झोन २)

सुहेल शर्मा, (पोलिस उपायुक्त झोन ३)

शशिकांत बोराटे, (पोलिस उपायुक्त झोन ४)

विक्रांत देशमुख, (पोलिस उपायुक्त झोन ५)

अमोल झेंडे, (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा)

विजय मगर, (पोलिस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग)

रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त झोन ५ येथून मुख्यालय)

श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)

बायकोच्या जाचाला कंटाळून पतीची राहत्या घरी आत्महत्या

गेल्या ४ वर्षांपासून पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खडकी भागात घडला.

सत्तारांविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक

सत्तारांविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणी महिलांनी मोर्चा कढून निषेद नोंदवला आहे.

अबू आझमी आयटीच्या रडारवर  

अबू आझमी आयटीच्या रडारवर आहेत. त्यांच्याशी संबधित 20 ठिकाणी आयटीने छापेमारी केली आहे. मुंबईसह महाराष्ट्र लखनौ, उत्तर प्रदेशात आयटीकडून छापेमारी करण्यात आली आहे. अमरावती दौऱ्यावरून अबू आझमी माघारी आले आहेत.

मुंबईत गोवर आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक

मुंबईत गोवर आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईत आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत होणार बैठक आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि आरोग्य अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये गोवर आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तसेच काल कस्तुरबा रुग्णालयात एका लहान मुलाचा आजारामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आज बैठकीत आढावा बैठकीत घेतला जाणार आहे

नवनीत राणांना तात्पुरता दिलासा, पुढीच्या सुनावणीपर्यंत अटक वॉरंट नाही

बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं मोठं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही ते सांडू देणार नाही, असंही राऊत यावेळी म्हणालेत. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शिंदे गट आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू

न्यायाधीशांनी गर्दीचा व्हिडिओ दाखवला

तक्रारदार महिलेने 2 पुरुषांना धक्काबुक्की केली होती.

गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो.

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू आहे यामध्ये अवहाडांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे.

जगाची लोकसंख्या 800 कोटींवर 

जगाची लोकसंख्या 800 कोटींवर पोहचली असून भारताची लोकसंख्या 135 कोटींहून अधिक झाली आहे.

कुख्यात डॉन अरुण गवळीला सुरक्षेविना पॅरोल मंजूर

कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. मुलाच्या लग्नासाठी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी, एक कार्यकर्ता गंभीर जखमी

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज नववा दिवस आहे. ही यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. दरम्यान, सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

मुंबईत गोवरचा पाहिला बळी 

मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील 12 विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. मुंबईत गोवरचा पाहिला बळी गेला आहे. 2 वर्षाच्या मुलाचा यामध्ये मृत्यु झाला आहे.

धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला पुन्हा मिळणार? आज महत्त्वपूर्ण सुनावणी

शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे राज्याचं लक्ष्य असणार आहे. .

महाडमधील केमिकल कंपनीमध्ये वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू, 2 जण गंभीर

महाड एमआयडीसीमधील प्रसोल कंपनीमध्ये सोमवारी रात्री वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायुगळतीमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांना वायूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या वडिलांचे निधन

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचे वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले. हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत.

अंबरनाथमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात 

अंबरनाथमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. ही कार झाडाला जाऊन धडकली त्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.

ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमनसामने, प्रचंड राडा

ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमनसामने, प्रचंड गोंधळ झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या गोंधळावेळी खासदार राजन विचारे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. किसन नगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात आला होता.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

24 तासात तिघांच्या हत्येच्या घटनेने नागपूर हादरले

फक्त 24 तासात तब्बल तिघांच्या हत्येच्या घटनेने नागपूर हादरले आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी मित्राची हत्या झाली आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला. तर दुसरी घटना पाचपावली भागात घडली आहे. तिघांनी मिळून एकाची हत्या केली, तर तिसरी घटना नागपूर शहर जवळच्या बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीसांचा खबरी असल्यामुळे दोघांनी सुनील भजे या इसमाची हत्या केली. तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com