
पंजाब काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. २०१५ मध्ये सीमेपलीकडे अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी त्यांच्याविरोधात जारी केलेले समन्स कोर्टाने रद्द केले.
बीबीसीच्या मुंबई कार्यालयातील सर्वेक्षण संपल आहे. तब्बल ५५ तासानंतर हे सर्वेक्षण संपल आहे. यावेळी आयटी विभागाने कागदपत्र, पेन ड्राईव्ह हस्तगत केले आहेत.
मुलुंड पश्चिममध्ये दुकानांना आग लागली आहे. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाली आहेत.
एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन उद्या सकाळी ८ वाजता अलका चौकात होणार होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कसबा पोट निवडणुकीमुळे मतदार संघात आचारसंहिता लागू आहे. यामुळे कोणतेही आंदोलन करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारने शिवभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. शिवनेरीवर जाणाऱ्या ३ टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या अखेर गिरीश बापट मैदानात उतरले आहेत. आजारी असूनही पुण्याचे बापट यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात हजेरी लावली आहे.
शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डीत नाईट लँडिंगची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची काकड आरतीची इच्छा पूर्ण होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोटनिवडणुकीत मविआविरुद्ध भूमिका स्पष्ट केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, कसब मतदारसंघाबाबत अद्यात भूमिका गुलदस्त्यात आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. ७ जणांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण जाणार का? हा प्रश्न कायम आहे.
ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा प्रतिवाद
ठाकरे सरकार पडल्यावर दोन वेळा मतदान
अपात्र आमदारांवर मतदानाची वेळ आली नाही- सिब्बल
नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रात लागू होत नाही - सरन्यायाधीश
अध्यक्षांच्या अधिकारावरून 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठात गहन चर्चा सुरू आहे.
ठाकरे गटाची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष
अध्यक्ष निर्णय घेतात आणि सदस्यांच्या आपत्रतेवर परिणाम करू शकतं - सरन्यायाधीश
उपाध्यक्षांविरोधात नोटिस दिल्यानंतर ते निष्पक्ष राहत नाहीत
सरन्यायाधीशांकडून युक्तिवादाच कथन
उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस नियमानुसार नव्हती. नोटीस दिली तेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो. आमदार गुवाहाटीत असताना त्यांना जीवे मारण्याची धमक्या. गुवाहाटीमध्ये होतो, तेव्हा महाराष्ट्रात तणावाची स्थिती होती. खासदार श्रीकांत शिंदेंचं कार्यालय जाळण्यात आलं.
बहुमत चाचणीला सामोर जाण्यापूर्वीच 29 तारखेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला कारण आपण बहुमत गमावलं आहे, हे त्यांना कळलं होतं.
शिंदे गटाकडून मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे.
शिंदे समर्थक आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना मारण्याच्या धमक्या
मध्यप्रदेशातील सत्तसंघर्षाचा जेठमलानी यांच्याकडून दाखला
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अँक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट वर आहे. पुणे पोलिसांकडून रेकॉर्ड वरील तीस हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पुणे पोलिसांकडून जवळपास दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. मागील सात वर्षातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी पुणे पोलिसांनी तयार केली आहे. कोयता गँग सह छोट्या-मोठ्या अशा एकूण१० हजार ९७३ गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर ७५ जणांवर पुणे पोलिसांकडून मोक्का, एकूण ४३ गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे. रात्री देखील पोलिसांकडून होत नाकाबंदी. गाड्यांची तपासणी केली जात आहे.
सांगलीच्या टिंबर एरियामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाण्यातील गुरु प्रेरणा इमारतीला लागली आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रहिवाशी लोकाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यापप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्रिपुरातील आठ जिल्ह्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. धलाई, गोमती, खोवाई, उत्तरी त्रिपुरा, सेपहिजाला, दक्षिण त्रिपुरा, उनाकोटी आणि पश्चिम त्रिपुरा येथील 60 मतदार संघात मतदान होणार आहे. 31 महिलांसह 259 उमेदवार मैदानात उतरले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होत आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.