Jitendra Awhad News : महेश आहेर मारहाण प्रकरण, आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad News

Jitendra Awhad News : महेश आहेर मारहाण प्रकरण, आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Jitendra Awhad Latest News : ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यापप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि इतर सात समर्थकांविरोधात नौपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये होता.

आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी तिहार कारागृहातील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजीला सुपारी दिल्याचा उल्लेख यामध्ये होता. या प्रकारानंतर खळबळ उडाली होती.यानंतर जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच पोलिसांनी महेश आहेर यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी भादंवि कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब)सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आहेर यांचीच ही धमकीची क्लिप असल्याचं सांगत आव्हाड समर्थकांनी मारहाण केली आहे.

टॅग्स :ThaneNCPjitendra awhad