अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा अन् दिवसभरातील अपडेट्स एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
esakal Breaking News
esakal Breaking News

गिरीश बापटांच्या भेटीनंतर शाहांनी घेतली हेमंत रासनेंची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली.

"विजयी होऊन या, तुम्हाला शुभेच्छा आहेत," असं अमित शहा हेमंत रासने यांना म्हणाले.

पुणे दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी घेतली अनेक परिवरांची भेट.

टिळक कुटुंबीय यांच्या समावेत जगताप कुटुंबीयांची देखील भेट घेतली.

अमित शहा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला

काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन बापट यांची भेट घेतली होती.

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर असून शहरातील विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.

अमित शाह यांच्या हस्ते 'मोदी@20' पुस्तकाचे प्रकाशन

"मोदी@२०" या मराठी अनुवादीत पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असून संघटन मंत्री जयप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित आहेत.

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लागले पुण्यात पोस्टर

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लागले पुण्यात पोस्टर

धनकवडी भागातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

'सगळं चोरलं पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ?' असा सवाल केला उपस्थित

'आम्ही कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत' असा मजकूर लिहिला आहे

कृणाल धनवडे यांनी धनकवडी भागात ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहे

पत्राचाळ प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक का केली नाही- कोर्ट

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक का केली नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करताना कोर्टाने हा मुद्दा उपस्थित केला.

सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी बँड विकसित करणार- अमित शाह

सेंद्रिय शेती वाढत आहे. परंतु सेंद्रिय मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी एक समिती गठित करुन एकच ब्रँड डेव्हलप करुन जगभरात माल विकण्यात येईल, अशी घोषणा शाह यांनी यावेळी केली.

देशातल्या सहकार क्षेत्रात ३१ टक्के वाटा साखर उद्योगाचा- शाह

भारतातल्या सहकार क्षेत्रात 31 टक्के योगदान साखर उद्योगाचं असून 16 % दूध, गहू 13% आणि तांदूळ - 20% टक्के वाटा उचलत असल्याचं अमित शाहांनी सांगितलं.

सहकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांची सोडवणूक करणार- शाह

'सकाळ'च्या वतीने बँकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.

यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले की, या परिषदेत मांडल्या गेलेल्या अनेक मुद्द्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

शाहू महाराजांनी कास्तकरांसाठी एक संस्था सुरू केली. सहकार हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे.

विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता आणि अमुलचे संस्थापक यांचा त्यात समावेश आहे.

३० वर्षांपेक्षा जास्त सहकार क्षेत्रात मी काम केलं आहे. अनेक वर्षे कृषी आणि सहकार मंत्रालय वेगळं करण्याची मागणी होती. पण ते झालं नव्हतं.

अमित शाह जास्त बोलत नाहीत, फटक्यात काम करून टाकतात- मुख्यमंत्री

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सहकार परिषदेचे आयोजन करणयात आलेलं आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या परिषदेतून काही तर चांगल घडेल, सहकारी चळवळीचे विकासात मोठे योगदान आहे. अमित शाह यांना ज्यावेळी अडचणी सांगितल्या त्यावेळी त्यांनी सांगितल, हो जाएगा... ते जास्त बोलत नाहीत. फटक्यात काम करून टाकतात, असं शिंदे म्हणाले.

फडणवीसांकडून अमित शाहांचा 'कर्मठ' असा उल्लेख

भारत सरकारचे कर्मठ आणि कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री असा अमित शाह यांचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित सहकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तसेच एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख त्यांनी केला.

सहकारातल्या अडचणी अमित शाहांनी तातडीने सोडवल्या- फडणवीस

अमित शाह हे सहकार क्षेत्रातील नेतृत्व. त्यांच्या सुरूवातीचा काळात त्यांनी जिल्हा बँक सांभाळली आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा सहकार क्षेत्रातल्या अडचणी घेऊन जातो होतो तेव्हा त्यांनी तातडीने उपाययोजना केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सहकारी कारखान्यावर टांगती तलवार होती. कोर्टात अडचणी होत्या. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन प्रश्न संपवला. Retrospective amendment tax law मध्ये करता येत नाही. त्यामुळे त्यांनी मार्ग काढलं आणि १० हजार कोटींचा income tax वाचवल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

'सकाळ'च्या सहकार महापरिषदेसाठी अमित शाहांची उपस्थिती

'सकाळ'च्या वतीने बँकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.

पुण्यात एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

पुण्यात दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांसमोर तुफान घोषणाबाजी

दोन्ही कार्यकर्त्यांना मध्ये बाचाबाजी

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक

पोलिसांची मध्यस्थी

दिल्लीत स्थायी समितीच्या निवडी होणार

दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडणुकीसाठी तहकूब केलेली पालिकेची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो- सुनिल राऊत

महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो. आमचं चिन्ह आणि पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे. त्यामुळे कुणी काहीही केलं तरी फरक पडत नाही, असं विधान आमदार सुनिल राऊत यांनी केलं आहे.

ही गर्दी ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी- भास्कर जाधव

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, आमचे नेते, उपनेते, आमदार-खासदार यांची बैठक उद्धव साहेबांनी बोलवली होती. मात्र हजारो लोक मातोश्रीसमोर गोळा झाले होते. उद्धवसाहेबांना पाठिंबा देण्यासाठीच ही गर्दी झाली होती. आम्हीच लोकांना विनंती केली की, तुम्ही घरी जा. अखेरीस उद्धव ठाकरे यांनी गाडीवर उभं राहून सर्वांना धान्यवाद दिले. मी लढाई करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचं जाधव म्हणाले.

मातोश्रीच्या गेटवर ओपन जीपवरून साधला कार्यकर्त्यांशी संवाद

आपण पुन्हा एकजुटीने लढू

चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू

शिवसेना संपवता येणार नाही.

शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे.

निवडणुकीच्या तयारीला लागा. शिवसेना कोणीही संपवू शकणार नाही.

माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झालीए

मातोश्रीच्या गेटवर ओपन जीपवर भाषण करणार

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाची निदर्शनं

कोल्हापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटानं आज निदर्शनं केली. बिंदू चौकात ठाकरे गटानं आंदोलन करत भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

लोकशाहीचं रक्षण करणं ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी - प्रियांका चतुर्वेदी

भाजपनं EC, ED आणि CBI यांना त्यांचं निवडणूक टूलकिट बनवलंय. आता त्यांचं पुढील लक्ष्य न्यायव्यवस्था आहे. कायदामंत्री आणि राज्यसभेचे सभापती न्यायव्यवस्थेला आव्हान देत आहेत, त्यामुळं लोकशाहीचं रक्षण करणं ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे, असं स्पष्ट मत प्रियांका चतुर्वेदी (उद्धव ठाकरे गटाच्या नेते) यांनी व्यक्त केलं.

दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले १२ चित्ते

मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पुन्हा एकदा नवीन चित्ते आणण्यात आले आहेत. 7 नर चित्ता आणि 5 मादी चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. या 12 चित्त्यांना एका मोठ्या बंदोबस्तात सोडणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय वनमंत्री यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे वनमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा थोड्याच वेळात शपथविधी

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. दुपारी साडे बारा वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनात या शपथविधीची पूर्ण तयारी झाली आहे. राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

क्रिकेटर पृथ्वी शॉ सेल्फी वादातील तरुण पोलिसांच्या ताब्यात

क्रिकेटर पृथ्वी शॉ सेल्फी वादात रुद्र आणि साहिल नावाच्या 2 तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण 3 जणांना अटक केली असून तर 5 जण फरार आहेत. तर अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं त्यामुळे कोल्हापूरमध्ये आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

ठाकरे गटाचं मशाल चिन्हही धोक्यात?

निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र या चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजला रामराम ठोकलेले चिंचवडचे माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज संध्याकाळी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाच्या उलटा लागला तर?

आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून त्याचबरोबर घटनातज्ञ यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान घटनातज्ञ उल्हास बापट यांनी या संबधी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. निवडणूक आयोगाकडे मॅच्युरिटी असणं आवश्यक होतं. आयोगाच्या या निर्णयाचे राजकीय परिणाम होऊ शकतात.


पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पक्षाची बैठक बोलावली

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज तात्काळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुढची भूमिका काय यावर चर्चा होणार आहे. मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तात्काळ मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; भाजपकडून जय्यत तयारी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून या निवडणुकांची राज्यभर चर्चा होत आहे. त्यातच या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह आज थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर्सदेखील लावण्यात आले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com