देश-राज्यात आज काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? येथे वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ST

देश-राज्यात आज काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? येथे वाचा एका क्लिकवर

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

शिंदे-फडणवीस सरकारची एसटी कामगारांना दिवाळी भेट दिली आहे. यासाठी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे.

पुणे, सोलाूपर जिल्हातील वाहतुक बंद...

सोमवारी रात्री बारामती तालुक्यामध्ये मुसळधार पाउस झाला. पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला. बारामतीमधील कऱ्हा नदीचे पाणी नीरा नदीमध्ये वाहुन आले.तसेच वीर धरणातून आज पहाटे २६१८५ क्युसेक वेगाने नीरा नदीमध्ये पाणी सोडले होते. तसेच इंदापूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरुन वाहिल्याने नीरा नदीला पूर आला.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुन्हा पावसाला सुरूवात

पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. विमान नगर, शास्त्री नगर, चंदन नगर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.

पुण्यात मध्यवर्ती भागात पुन्हा पावसाला सुरूवात

काल झालेल्या पावसामुळं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्रा आज पुन्हा पुण्याच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरूवात झाली आहे.

'मी एकदम ओक्के, लवकरच बाहेर येईन', न्यायालयात खडसेंजवळ संजय राऊतांनी दिला निरोप

सुनावणीसाठी न्यायालयात संजय राऊत यांना आणण्यात आलं होतं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची राऊतांसोबत भेट झाली. त्यावेळी राऊतांनी मी ओके आहे आणि लवकरच बाहेर येणार असल्याचं खडसेंजवळ सांगितलं.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट

संजय राऊत यांच्या जेलमधील मुक्काम वाढला 

संजय राऊत यांच्या जेलमधील मुक्काम वाढला आहे. आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होती पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर आता 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

केदारनाथमध्ये हेलीकॉप्टर दुर्घटनेबद्दल पंतप्रधान यांनी व्यक्त केला दु:ख

केदारनाथमध्ये हेलीकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

इयत्ता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्यापासून दहावीचे परीक्षा अर्ज भरायला सुरवात होणार आहे. 19 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

2023-24 मार्केटिंग हंगामासाठी गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपयांची वाढ

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये 110 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यासह, 2023-24 साठी गव्हाचा एमएसपी प्रति क्विंटल 2,125 रुपये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

बिल्किस बानो अत्याचार प्रकरणावर काहीच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किस बानो प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 11 आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने माफ केल्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आपलं उत्तर सादर केलं आहे. त्यानंतर या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे.

केदारनाथमध्ये हेलीकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलीकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं, अशी माहिती समोर आली आहे. एकूण आठ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं सांगितलं जात आहे. उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं.

बिल्किसबानो अत्याचार प्रकरणावर काहीच वेळात’सर्वोच्च’ सुनावणी

गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किस बानो प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 11 आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने माफ केल्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आपलं उत्तर सादर केलं आहे. त्यानंतर या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे.

भाजपचा मोठा डाव, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही फोडणार; रोहित पवार यांचा दावा

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीत वर्तृळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल 

रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्याकडे सरकारच लक्ष्य नाही असा आरोपही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. सामान्य लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी घोषणा केली होती. आता दिवाळी तोंडावर आली तरी अजून ते जनतेपर्यंत पोहचले नाही. राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्याच्या रस्त्यांना तर नद्यांचं स्वरुप प्राप्त झालेलं आहे, शेतीत हातचं पीक वाया गेलंय. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. या सरकारचं राज्यातल्या जनतेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दोन तासानंतर होणार आमदार संजय शिरसाट यांची अँजिओग्राफी 

आमदार संजय शिरसाट यांच्यावर लिलावती रुग्णालयात डॉ. गोखले उपचार करत आहेत. दोन तासानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहेत. संजय शिरसाट यांच्यावर होत असलेल्या उपचारासंदर्भांत मुख्यमंत्र्यानीही माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.

संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर युक्तिवाद सुरू 

खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याच्या संदर्भात सध्या ईडीच्या अटकेत आहेत. दरम्यान त्यांनी जमीन अर्ज केला होता. त्यावर आज युक्तिवाद सुरू आहे. ईडीच्या युक्तिवादानंतर राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू केला आहे. ईडीने न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादात म्हंटले आहे की, पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत हे या सर्व घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचं ईडीने म्हंटलं आहे. ते बाहेर पडल्यानंतर तपास आणि पुरावे यामध्ये छेडछाड करू शकतात असंही ईडीने म्हंटलं आहे.

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जमीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि वकील इंद्रपाल सिंग यकटीवड करणार आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, उत्तरप्रदेशच्या दोन मजुरांवर हल्ला

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्याचं समोर आलं आहे. आज (मंगळवारी) दहशतवाद्यांनी दोन मजुरांची ग्रेनेड फेकून हत्या केली आहे. दोन्ही मजूर उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथील आहेत. मनोज कुमार आणि राम सागर अशी मजुरांची नावे आहेत.

मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज दुरुस्तीसाठी बंद 

मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज दुरुस्तीसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत. आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे विमान उड्डाणाच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांनी आपल्या आरक्षित विमानाच्या उड्डाणाच्या संबधित विमान कंपनीकडून माहिती घ्यावी असं आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सध्या 800 पेक्षा जास्त विमाने दररोज उतरतात आणि उड्डाणे घेतात.

पुण्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी 

पुण्यात सकाळी पावसाला सुरवात झाली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. पुण्यातील एस.बी रोड, पुणे विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे नाशिक महामार्गवरील वाहतूक ठप्प

चाकण ते आळंदी फाटा 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पोलिसांना दिवाळी बोनस देण्यासाठी मनसे नेत्याचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

पोलिसांना दिवाळी बोनस देण्यासाठी मनसे नेते मनोज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. पोलिसांना दिवाळी बोनस देण्याची मागणी या पत्रातून केली आहे. 'सणासुदीच्या काळात पोलिसांचं आर्थिक समाधान व्हावं' असंही पत्रातून चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

भांडुपमधील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात दुर्गा चायनीज सेंटर हॉटेलला भीषण आग

अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून व्हिडिओमध्ये या आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं आहे. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. काल दुपारपासून त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर दिल्ली दौरा!

अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी एक वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील माघारीनंतर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या या दौऱ्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळीची भेट

गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट म्हणून म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपये वाढ तर गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्यभर परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही राज्यात पावसाचा यलो अलर्ट

परतीच्या पावसाने राज्याभरात थैमान घातलं आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टे देण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यभरात परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, क्रीडा या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर