दिवसभरात देशात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लीकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

दिवसभरात देशात काय महत्वाच्या घडामोडी घडल्या? वाचा एका क्लीकवर

दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला, पुढील सुनावणी सोमवारी होणार

शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाणावर कोणाचा हक्क आहे? यावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी यावर जोरदार युक्तीवाद केला आणि काही मुलभूत मुद्दे मांडले. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला आयोग सोमवारी निकाल लेखी स्वरूपात देणार

दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला आयोग सोमवारी निकाल लेखी स्वरूपात देणार

दोन्ही गटाकडून युक्तिवाद आजच संपणार, आयोग निकाल राखून ठेवणार असल्याची शक्यता

दोन्ही गटाकडून युक्तिवाद आजच संपणार आहे मात्र निवडणूक आयोग निकाल राखून ठेवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता पुन्हा शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येत आहे.

अखेरचे १० मिनिट, दोन्ही गटांकडून युक्तिवाद संपणार

अखेरचे १० मिनिट, दोन्ही गटांकडून युक्तिवाद संपणार आहे. ठाकरे गटाकडून संपूर्ण युक्तिवाद पुर्ण झाला आहे. तर शिंदे गटाकडून चालू आहे.

मविआ सरकार कसं बनवलं, शिंदे गटाकडून युक्तिवाद

भाजप-शिवसेना युती मिळून मतं मागितली मग मविआ सरकार कसं बनवलं, शिंदे गटाकडून सवाल उपस्थित.

एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतेपद बेकायदेशीर, वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद

एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकिल करत आहेत.

मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनेतच नाही, त्यामुळे ते पद बेकायदेशीर- देवदत्त कामत

ठाकरे गटाकचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु

ठाकरे गटाकचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद सुरु झाला आहे. ठाकरे गट राजकीय पक्ष म्हणून कसा योग्य आहे हे आयोगाला पटवून देत आहेत.

ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला, वाचा महत्त्वाचे मुद्दे

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तावाद

शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही.

पक्ष सोडून गेलेले नेत प्रतिनिधी सभेचा भाग होऊच शकत नाही.

घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच.

प्रतिनिधी सभा ही पक्ष चालवतो.

शिंदे गटाने लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं.

राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली आहेत का?

शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही.

हेही वाचा: Shivsena Symbol : ठाकरे गटाच्या युक्तिवादामुळे शिंदे गट अडचणीत? कपिल सिब्बल यांनी बाहेर काढला हुकमी एक्का

ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकरत नाही, ठाकरे गटाचा जोरदार युक्तीवाद सुरु

ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकरत नाही, ठाकरे गटाचा जोरदार युक्तीवाद सुरु

ठाकरे गटाची कार्यकारिणी पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे ती बरखास्त होऊ शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिबब्ल यांनी केला.

हेही वाचा: Shivsena Symbol : शिंदेंचं कालचं भाषण आज अडचण ठरण्याची शक्यता; निवडणूक आयोगासमोर...

शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर सिब्बल यांचा अक्षेप

शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर सिब्बल यांनी अक्षेप घेतला आहे. सिब्बल म्हणाले की त्यांची प्रतिज्ञापत्रे तपासून पाहा.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा आयोगात युक्तावाद सुरू

शिवसेनेची घटना कायदेशीर नाही असं शिंदे गट कोणत्या आधारावर म्हणतंय असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा आयोगात युक्तावाद सुरू

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा आयोगात युक्तावाद सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले असताना, शिंदे यांनी भाषणात आम्ही मोदींचेच असल्याचं परदेशात सांगितल्याचं मान्य केलं होतं. ही क्लिप ठाकरे गट आयोगात सादर करणार असल्याते सांगितले जात आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल निवडणूक आयोगात अद्याप पोहोचले नाहीत

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल निवडणूक आयोगात अद्याप पोहोचले नाहीत.

कपिल सिब्बल यांनी वेळ वाढवून मागितला आहे.

शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ठाकरे की शिंदे, आज होणार सुनावणी

शिवसेनाचे धनुष्यबाण कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज आयोग निर्णय देणार की पुन्हा नवी तारीख देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र ही सुनावणी ४ वाजता पार पडणार आहे.

पुण्यातील रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

एकाच ठेकेदाराला महापालिकेची कामे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच पुण्यात आंदोलन सुरु आहे. त्यासोबतच सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आमदार खासदार इतर ठेकेदाराला धमकावत असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

नवनित राणांच्या अडचणी कायम

राणांचे वकील गैरहजर असल्याने सुनावणी तहकुब करण्यात आली आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिंदे फडणवीसांची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यात सयुक्त बैठक होत आहे. अंतर्गत कुरुबुरींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. या बैठकीला शिंदे गट, भाजपचे सर्व आमदार आणि खासदार ऑनलाईन पद्धतीन उपस्थिती लावणार आहेत.

पुण्यातील आघोरी प्रकाराची महिला आयोगाने घेतली दखल

पुण्यातील आघोरी प्रकाराची महिली आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करावी. अशी सूचना देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात १२ किमी चाललो. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे. ईडी चौकशीबाबात आमचे अनुभव एकमेकांना सांगितली. अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा जाली. राहुल गांधी नेहमी सर्वांशी प्रेमाने वागतात.

पुण्यात कपडे चोरांना पोलिसांनी सिनेस्टाइल पकडले

पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या कपड्याच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. दुकानाचे शटर उचकटून या चोरट्यांनी दोनशेहून अधिक कपडे चोरलेले होते. मात्र, पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करून या चोरट्यांना रंगेहात पकडले. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्यास ताब्यात घेतलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चोरट्यांकडून १ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मंत्री गडकरींना धमकीचा फोन करणाऱ्याची चौकशी सुरु - गृहमंत्री ज्ञानेंद्र

बंगळुरु : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नुकतंच फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीनं गडकरींकडं तब्बल 100 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र (Araga Jnanendra) यांनी कर्नाटक पोलिसांना (Karnataka Police) चौकशीचे आदेश दिले आहेत. माध्यमांशी बोलताना गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, 'मंत्री गडकरींना धमकीचा फोन करणाऱ्याची चौकशी सुरु असून आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल. कारागृह आणि पोलीस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.'

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक हिंदू संघटना या मोर्चेत सामील होणार आहेत. रविवारी पुण्यातील लाल महाल जवळ या ठिकाणी सगळ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर व्हावा ही मोर्चेची प्रमुख मागणी असणार आहे.

राज्य सरकारचा महत्त्वाच निर्णय

न्यायालयीन लढ्यासाठी मंत्र्यांची परवानगी बंधनकारक.

क्रीडा मंत्र्यांचा ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांचा अल्टिमेटम

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. दरम्यान, आंदोलक कुस्तीपटूंची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

थंडीपासून दिलासा मिळणार

येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे.

धनुष्यबाण कुणाचा आज पुन्हा सुनावणी

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे सर्वोंचे लक्ष लागले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुक आयोगात आज सुनावणी आहे. ठाकरे आणि शिंदे गटासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. तसेच काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील सुरू ठेवलेलं आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली.