Shivsena Symbol : शिंदेंचं कालचं भाषण आज अडचण ठरण्याची शक्यता; निवडणूक आयोगासमोर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde & Uddhav Thackeray news

Shivsena Symbol : शिंदेंचं कालचं भाषण आज अडचण ठरण्याची शक्यता; निवडणूक आयोगासमोर...

नवी दिल्लीः शिवसेना पक्षचिन्हासंदर्भात आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून ताकद लावली जात असून खरी शिवसेना कुणाची? याचा निवडणूक आयोगातील निर्णय आज होऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण आज शिंदे गटाची अडचण ठरण्याची शक्यता आहे. कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मोदींचेच असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन आज ठाकरे गट नवा मुद्दा उपस्थित करु शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नेमका अडचणीचा मुद्दा काय?

  • काल पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत केलेलं वक्तव्य निवडणूक आयोगासमोर मांडले जाण्याची शक्यता

  • ठाकरे गटकाडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाचा उल्लेख होण्याची शक्यता आहे

  • कालच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही मोदींचेच असल्याचं परदेशात सांगितलं, असा दाखला दिला होता

  • ठाकरे गटाचे वकील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दा उपस्थित करु शकतात

  • मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिप निवडणूक आयोगासमोर दाखवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

हेही वाचा: Shiv Sena Symbol : काय आहे धनुष्यबाणाचा वाद? 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेचे ४० आमदार फोडले. राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन झाली. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावर दावा ठोकला. 'आमचीच खरी शिवसेना?' असं म्हणत निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा केला. आज यासंदर्भात अंतिम निर्णय येऊ शकतो