
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला.राज्यपाल निपक्ष असायला हवेत, राज्यपाल जे बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवायला पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. मी त्यांना राज्यपाल म्हणणं सोडून दिलं आहे. ही शक्कल याच्या काळ्या टोपीतून आलेली नाही, या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले.
पुरंदर विमानतळासाठी तातडीन जागेचं अधिग्रहण करा असे अदेश देण्यात आले आहेत, नियोजित जागेसंदर्भात सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. धुळे कराड आणि सोलापूर या विमानतळांचा देखील विकास करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
वाशीच्या हॉटेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. हॉटेलमध्ये मराठी गाणी लावण्यावरून हा वाद सुरू झाला आहे. हॉटेल व्यवस्थापकाला मनसे सैनिकांनी मारहाण केली आहे.
उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.
राज्यपालांनी सगळ्याच मर्यादा सोडल्या आहेत. त्यामुळं राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीच दखल घ्यावी. अशी वक्तव्य करणाऱ्यांकडं मोठी जबाबदारी देणं योग्य नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी (बसवराज बोम्मई) मागणी केली आहे, तशी मागणी आम्हीही करतो. आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी मागतो. त्याठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आहेत. त्यामुळं बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तर चर्चा शक्य आहे, असं प्रत्युत्तर पवार यांनी बोम्मईंना दिलंय.
शिवरायांनी माफीनामा लिहून दिला याचा पुरावा काय? असा प्रश्न उदयनराजे यांनी केला आहे. तर राज्यपालांच्या व्यक्तव्याचा आधार काय आहे ? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपालांच्या व्यक्तव्याचा आश्चर्य वाटलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे. दुपारी २ ते ३ दरम्यान वर्षावर भेटीसाठी बोलावलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेल्या रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रोखलं आहे.
गेल्या 24 तासांपासून विक्रम गोखलेंची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत, तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही, असं गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांनी सांगितले आहे.
शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. अशातच सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळ सोनं अर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.
चिंचपाडा रोड श्रीराम अनुग्रह टॉवरमध्ये बिबट्या शिरला आहे. चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ तीन जण जखमी झाले आहेत. वनविभागला पाचारण करण्यात आले आहे. बिबट्याचा धुमाकूळमध्ये कल्याण पूर्वेतील 2 जण जखमी झाले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे. दुपारी २ ते ३ दरम्यान वर्षावर भेटीसाठी बोलावलं आहे
राज्यपालांना हटविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या माजी आमदाराने रक्ताने पत्र लिहिलं आहे. आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी हे पत्र लिहिलं आहे. वर्ध्यातील आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी या पत्रातून अमर काळे यांनी केली आहे. राज्यपालांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी यावेळी पत्रातून करण्यात आली आहे.
पुण्यात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात विश्व हिंदू मराठा संघानं अनोखं आंदोलन केलं. राज्यपालांची अंत्ययात्रा काढत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. पुण्यातील चतु:र्शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही अंत्यात्रा काढण्यात आली. पोलिसांची या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भापाठोपाठ आता स्वतंत्र्य मारठवड्याची मागणी करण्यात येत आहे. निधी अभावी मराठवड्याचा विकास रखडला आहे असंही त्यावेळी बोललं जात आहे.
नवाब मालिक यांना बेल की जेल? हे आज ठरणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मालिकांना जमीन की कोठडी ही आज ठरणार आहे.
काल अकोला रेल्वे स्थानकावर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मागच्या 15 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे.
पुण्यातील नवले ब्रिजवर लागले हटके बॅनर दिसून येत आहेत. जनजागृतीसाठी नवले ब्रीजच्या सुरुवातीला "सावधान नवले ब्रीज पुढे आहे" अशा मजकुराचे बॅनर लागले आहेत. बॅनर वर लागलेले चित्र आणि मजकूर चर्चेचा विषय बनत आहे. नवले ब्रिजवर अपघाताची सत्र सुरूच आहे. चार दिवसात नवले ब्रिजवर जवळपास पाच अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत. नवले ब्रिजवर सेल्फी पॉइंट येथे ही बॅनर लावण्यात आले आहे.
लातूरमद्धे पेट्रोल टँकर आणि ऊस ट्रॅक्टर यांचा अपघात झाला आहे. या आपघतानंतर पेट्रोल टँकरला आग लागली. दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. मध्य प्रदेश येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.