Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Cheetah Project India
Cheetah Project Indiaesakal

आणखी सात चित्ते भारतात येणार, केंद्राच्या उच्चस्तरीय समितीची माहिती

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आणखी सात चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात जंगलात सोडले जातील, असे केंद्राच्या उच्चस्तरीय समितीने म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काढली रॅली

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हाजरा मोर ते रवींद्र सदनपर्यंत रॅली काढली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आमची टीम कुस्तीपटूंना भेटून त्यांना पाठिंबा देईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणूनच आम्ही आज रॅली काढली आहे. ती उद्याही सुरू ठेवली जाईल. कुस्तीपटू ही आपल्या देशाची शान आहेत."

पुण्यातील पाषाण परिसरात पावसाला सुरूवात

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली

अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्याचा अधिकार मागणाऱ्या पाच हिंदू महिला उपासकांनी वाराणसी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याला आव्हान देणारी मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली.

हा ऐतिहासिक निर्णय आहे. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की अंजुमन इंतेजामिया मस्जिद समिती कायम ठेवण्यायोग्य नाही आणि ती नाकारली आहे, असे ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले.

Marathi News Live Update: नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देणार - देवेंद्र फडणवीस

नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देणार ; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!

कुस्तीपटूंनी तपास पूर्ण होऊ द्यावा, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची प्रतिक्रिया!

आंदोलक कुस्तीपटूंनी तपास पूर्ण होऊ द्यावा. त्यांना सर्वोच्च न्यायालय, पोलीस आणि क्रीडा विभागावर विश्वास ठेवावा लागेल. खेळाडूंनी मांडलेल्या मुद्यांची निःपक्षपातीपणे चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

धक्कादायक! शेळ्या चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाची हत्या

परभणी जिल्ह्यातील उखळद परिसरात शेळ्या चोरल्याच्या संशयावरून परराज्यातील तीन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्‍यातून पाणी सोडण्‍याची चाचणी यशस्वी

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेससह इतर पक्षातील अनेक नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. धानोरकर यांच्या कुटुंबीयांचं पटोले यांच्याकडून सांत्वन करण्यात आलं आहे. हजारो कार्यकर्ते त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले आहेत.

राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन! पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 'या' नेत्यांची निवड?

राष्ट्रवादीने आमदार हसन मुश्रीफ यांनाच कोल्हापुरातून लोकसभेतून तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. त्यांची अंत्ययात्रा थोड्याच वेळात निघणार आहे. या यात्रेला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.

पुणे, खडकी कँन्टोन्मेंट परिसर मनपा पालिका हद्दीत येणार? आज महत्त्वाची बैठक

पुणे छावणी आणि खडकी छावणी परिसर याचे महानगरपालिकेत विलिनीकरण व्हावे, यासंदरभात आजै बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी याबाबतीत चर्चा करणार आहेत.

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेयांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

पुण्यातील साई ट्रेडिंग कंपनीला भीषण आग

पुण्यातील साई ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आगीच्या घटना समोर येत आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com