Live Update: ADR Report नुसार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ADR Report नुसार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ

ADR Report नुसार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ

ADR Report नुसार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ

एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी इतकी होती. 2019 मध्ये 173 टक्क्यांनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली. तर , AIUDF चे खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 30 कोटी रुपये होती तर 2019 मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली आहे.

'अंधेरीचा न्याय चिंचवडसाठी का नाही?', शरद पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राहुल कलाटे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं आहे. याच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या व्यक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन करणाऱ्या शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल न्याय का लावला नाही असा सवाल सोशल मिडियावर विचारण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाचा सविस्तर- Sharad Pawar : 'अंधेरीचा न्याय चिंचवडसाठी का नाही?', शरद पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा चालू आहे. CM KCR यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी नांदेडमध्ये सुरूवात केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. मात्र भेटी मगील कारण समजू शकलं नाही. देशमुख जामीनावर बाहेर आल्यापासून पहिल्यांदाच भेट घेत आहेत.

भाजपकडून पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आव्हान

भाजपकडून दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आव्हान सर्व राजकीय पक्षांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्रध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे त्यांच्यावर दुबईमधील रूग्णालयात उपचार चालू होते.

आम आदमी पक्ष (आप) कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवणार

आपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आप चे प्रभारी गोपाळ इटालिया आज पुण्यात येणार आहेत. प्रभारी यांच्याकडून पुण्यातील नेते, पदाधिकारी यांच्या मध्ये चर्चा ,आप आज संध्याकाळी करणार अधिकृत घोषणा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांना फोन

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर