News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Updated on

दिल्लीच्या मंत्री आतिशी यांच्याकडे कायदा खात्याचा कार्यभार

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांच्याकडे कायदा खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. तर मंत्री कैलाश गेहलोत यांच्याकडे महिला व बालविकास खात्याची जबाबदारी देण्यात आलीय.

जयंत पाटील अन् वळसे पाटलांमध्ये विमानतळावर चर्चा सुरु

पुणे विमानतळावर जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटलांमध्ये चर्चा सुरु आहे. मागील अर्ध्या तासांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. दोघेही नागपूरहून पुण्यामध्ये दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबतची सुनावणी पूर्ण

राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबतची निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्ण झाली असून आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे.

योगेश कदम म्हणतात, सुनील प्रभूंचा व्हिप मिळाला नव्हता

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळामध्ये सुरु आहे. यावेळी आमदार योगेश कदम यांनी सुनील प्रभू यांचा व्हिप मिळाला नसल्याची साक्ष दिली आहे. परंतु ठाकरे गटाने व्हिपची पोचपावतीच अध्यक्षांसमोर सादर केली.

शरद पवारांनी सगळ्यांचा विश्वास गमावला- अजित पवार गट

शरद पवारांनी सगळ्यांचा विश्वास गमावला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगामध्ये केला आहे. शिवाय नागालँडमधील आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

नाना पटोले यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नागपूरमध्ये युवक काँग्रेसचा मोर्चा, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

नागपूरमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असं आम्ही म्हटलं नाही- पटेल

नवाब मलिक हे आमच्याबरोबर आहेत, अशी भूमिका यापूर्वी आम्ही कधीही मांडलेली नाही. विरोधकांना कुठलाही मुद्दा नसल्याने ते आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला; भुजबळ, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित

नवाब मलिक यांच्या विधिमंडळातील उपस्थितीनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान नवाब मलिक हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. या भेटी दरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात  महत्वाची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहचले असून पाचही नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाली.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले. यादरम्यान राज्यातील अवकाळी पाऊस व मराठा आरक्षण या मुद्द्यावर चर्चा कधी घ्यायची यावर सर्व नेत्यांमध्ये खलबते झाली. पुढील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि मराठा आरक्षण यावर चर्चा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवाब मलिकांवरून झालेल्या वादानंतर प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील फडणवीसांच्या भेटीला

प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. नवाब मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसल्यानंतर झालेल्या कालच्या वादानंतर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नवाब मलिक प्रकरण गाजत असताना प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्प फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या अंबदास दानवेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबदास दानवेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती.

गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! एसटी बँकेतील सत्ता अडचणीत?

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून असून एसटी बँकेतील सत्ता अडचणीत आली आहे. सदावर्तेंच्या एकाधिकारशाहिला कंटाळून 15 संचालक पाठिंबा काढून घेणार आहेत. माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबद्दलचा दावा केला आहे. संचालकांचा प्रवक्ता म्हणून बाजू मांडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी - वडेट्टीवार

हिवाळी अधिवेसनादरम्यान आज विधानसभेत कांदा निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात यावी अशी मागणी केली.

ZPM चे नेते लालदुहोमा बनले मिझोरमचे नवे मुख्यमंत्री

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) नेते लालदुहोमा यांनी शपथविधी सोहळ्यात मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत झेडपीएम पक्षाने २७ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं होतं.

फडणवीसांच्या लेटर बॉम्बनंतर दुसऱ्या दिवशीही मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात सहभागी झालेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना सत्तेत सहभागी करून घेण्याबद्दल अक्षेप घेत अजित पवारांना पत्र लिहीलं होतं. यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील त्याच बाकावर बसले आहेत.

News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Nawab Malik : मुख्यमंत्री देखील नाराज? फडणवीसांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीमध्ये अजित पवार पडले एकटे

विधीमंडळाच्या पायऱ्यावर भाजप आमदारांचं आंदोलन; राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी

विधीमंडळाच्या पायऱ्यावर भाजपच्या आमदारांकडून आंदोलन केलं जात आहे. काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या निषेध करत हे आंदोलन केलं जात आहे. यावेळी भाजप आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली झात आहे.

केसीआर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पीएम मोदींची पोस्ट

तेलंगणचे माजी मुख्यमंत्री केसीआर घसरून पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर देशाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर गरू यांना दुखापत झाल्याचे समजल्याने दुःख झाले. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

गुजरातमधील कच्छ येथे भूकंपाचे धक्के!

गुजरातमधील कच्छ येथे आज सकाळी ९ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS)ने याबद्दल माहिती दिली आहे.

खासदारकीचा राजीनामा देऊन आमदार बनलेल्या सदस्यांना घर खाली करण्यासाठी नोटीस

खासदारकीचा राजीनामा देऊन आमदार बनलेल्या सदस्यांना घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. १२ खासदारांनी २ दिवसांपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांना घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यापैकी ३ मंत्री होते. त्यांचा राजीनामा काल राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने या खासदारांना नोटिसा पाठवल्या असून ३० दिवसांच्या आत घर खाली करण्यासाठी सांगितलं आहे.

इंदापूरमध्ये दूध दर आंदोलन पेटलं, सोनाई डेअरीच्या दुधाचे टँकर फोडले, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

इंदापूरमध्ये दूध आंदोलन पेटलं आहे, सोनाई डेअरीच्या दुधाचे दोन टँकर फोडण्यात आले आहेत. टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, घोषणाबाजी करण्यात आली. यासंबधी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलीस आज घेणार ललित पाटीलचा ताबा; पथक मुंबईत दाखल

नाशिक : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलीस आज ललित पाटीलचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झाले आहे.

ललित पाटीलसह रोहित, झिशान आणि हरीशपंत यांनाही नाशिकला आणलं जाणार आहे. शिंदे गावातील एमडी ड्रग्स कारखाना, गोडाऊन प्रकरणी चौकशीसाठी नाशिक पोलीस ताबा घेणार आहेत.

मुंबई न्यायालयातून हस्तांतर प्रक्रिया पूर्ण होताच ऑर्थर रोड कारागृहातून नाशिक पोलीस ललितचा ताबा घेणार असून याआधी २ दिवसांपूर्वीच नाशिक पोलिसांनी घेतलाय भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेचा ताबा घेतला आहे.

थट्टा केल्याने आठ वर्षीय मुलीची हत्या; दोघे ताब्यात

पालघरमधील वसई परिसरात 8 वर्षीय मुलीचा कुजलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांपैकी एका आरोपीची थट्टा केल्याने या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. दोन आरोपींपैकी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. पेल्हार पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे.

पुणे पोटनिवडणुकीवरुन उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला खडेबोल

मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोटनिवडणुकीवरुन निवडणुक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत. निवडणुका, पोटनिवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कामच असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामावर परिणाम होईल असे कारण कसे देता असा सवाल उच्च न्यायालयाचा निवडणुक आयोगाल केला आहे.

पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेताना तुमच्याकडून देण्यात आलेली कारणे सकृतदर्शनी अवाजवी असून पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा अन्यथा आम्हाला आदेश करावा लागेल, अशा शब्दात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच पुणे पोटनिवडणूक संदर्भात आयोगाला सोमवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com