दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

narendra modi
narendra modisakal

१० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान महाराष्ट्र आणि यूपी दौऱ्यावर

१० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपी आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. सकाळी १० वाजता, ते लखनौला भेट देतील जेथे ते यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३ चे उद्घाटन करतील. दुपारी २:४५ वाजता, ते मुंबईत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील

औरंगजेबाच्या महालाचं संवर्धन करा, राष्ट्रवादीची मागणी! वाद पेटणार?

Ncp Letter
Ncp Letter

राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद येथील 'जुना महाल'चं संवर्धन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील कारखान्याला मोठी आग

रायगड जिल्ह्यातील महाड येथील कारखान्याला मोठी आग लागली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्याचे काम सुरू आगे.

आई सशक्त असेल तर संपूर्ण कुटुंब मजबूत - पंतप्रधान

आई सशक्त असेल तर संपूर्ण कुटुंब मजबूत असते आणि कुटुंब मजबूत असेल तर संपूर्ण समाज मजबूत असतो. माता-भगिनींची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. आज आम्ही आदिवासींसाठी पाण्याची व्यवस्था केली. आम्ही महिलांना धुरापासून मुक्त केले. आम्ही माता-भगिनींसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या विनाशावर हार्वर्ड नव्हे, मोठ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास होईल -  नरेंद्र मोदी

इथल्या काही लोकांना हार्वर्डची मोठी क्रेझ आहे. कोरोनाच्या काळातही असेच म्हटले होते आणि काँग्रेसने म्हटले होते की हार्वर्डमध्ये भारताच्या विनाशावर केस स्टडी होईल. पण गेल्या काही वर्षांत खूप चांगला आणि महत्त्वाचा अभ्यास झाला. त्याचा विषय होता - भारतीय काँग्रेस पक्षाचा उदय आणि अधोगती. मला खात्री आहे की भविष्यात काँग्रेसच्या विनाशावर हार्वर्ड नव्हे तर मोठ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास करावा लागेल. काँग्रेसला बुडवणाऱ्यांचाही अभ्यास केला जाणार आहे.

विरोधकांनी ईडीचे आभार मानावे - नरेंद्र मोदी

विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल. लोकसभेत बोलताना पीएम मोदी म्हणाले की ईडीने सर्व विरोधकांना एकत्र आणले आहे, त्यांनी ईडीचे (अंमलबजावणी संचालनालय) आभार मानायला हवे. कालण निवडणुकीचे निकाल त्यांना एकत्र आणू नाही शकले.

विरोधकांनी केला सभागृहाचा त्याग

2 जी आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

स्टार्टअप्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर - नरेंद्र मोदी

गेल्या नऊ वर्षांत ९० हजार स्टार्टअप्स भारतात आले आहेत. आज स्टार्टअप्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशातील शहरांमध्ये मोठी स्टार्टअप इकोसिस्टम पोहोचली आहे. इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात १०८ युनिकॉर्न तयार झाले. युनिकॉर्न म्हणजे सहा-सात हजार कोटींपेक्षा जास्त किंमत. आज भारत मोबाईल बनवणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

निराशेच्या गर्तेत बुडलेल्या लोकांना देशाची प्रगती मान्य नाही - नरेंद्र मोदी

भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. जगात भारताच्या समृद्धीत भरभराट दिसत आहे. निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. १४० कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना दिसत नाहीत.

श्रीमंत देशांच्या G-20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी -पंतप्रधान

आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या G-20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, हीही आनंदाची बाब आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. १४० कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पण आधी असे वाटले नव्हते, पण आता असे दिसते की काही लोकांना यामुळे वाईट वाटत आहे. ज्यांना याचा त्रास होत आहे ते कोण आहेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

आव्हानांशिवाय जीवन नाही - पंतप्रधान

आव्हानांशिवाय जीवन घडत नाही, आव्हाने येतात, परंतु १४० कोटी देशवासीयांची भावना आव्हानांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. आव्हानांपेक्षा त्याची ताकद मोठी आणि मजबूत आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. तीव्र महागाई आहे. खाण्यापिण्याचे संकट आहे. आपल्या आजूबाजूलाही ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत कोणता भारतीय अभिमान बाळगणार नाही, की आजही हा देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मकता आहे.

जगातील समस्या सोडवण्याचे भारत माध्यम - नरेंद्र मोदी

आज जगातील समस्या सोडवण्याचे भारत माध्यम बनत आहे. देशातील लोकांनी ज्या मूलभूत सुविधांसाठी अनेक दशके वाट पाहिली, त्या या वर्षांत मिळाल्या आहेत.

सरकारी योजनांमधील भ्रष्टाचारापासून देशाला स्वातंत्र्य

मोठमोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार यापासून देशाला स्वातंत्र्य हवे होते, ते देशाला मिळत आहे, असे राष्ट्रपतींनी भाषणात सांगितले. आज देश वेगाने विकासाच्या मार्गावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांनी राष्ट्रपतींचा अपमान केला - नरेंद्र मोदी

राष्ट्रपतींचे भाषण सुरू असताना काही लोकांनी पलटी मारील. एका बड्या नेत्याने तर राष्ट्रपतींचा अपमान केला आहे. आदिवासी समाजाप्रती द्वेषही दाखवला आहे. टीव्हीवर अशा गोष्टी बोलल्या गेल्या की आत द्वेषाची भावना निर्माण होते, सत्य बाहेर येत राहतं. बरं, नंतर पत्र लिहून पळून जाण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चा ऐकत असताना मला वाटले की अनेक गोष्टी मूकपणे स्वीकारल्या गेल्या आहेत. राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणाचाही आक्षेप किंवा टीका नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधी यांची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेकांनी आपली मते येथे मांडली. प्रत्येकाचं बोलणं ऐकताना हेही ध्यानात येतं की कोणाकडे किती क्षमता आहे, ते किती समजूतदार आहेत आणि कोणाचा हेतू काय आहे. काही लोकांच्या भाषणानंतर इकोसिस्टम उसळत होती. समर्थक उड्या मारत होते.

लोकसभेत नरेंद्र मोदींचे भाषण सुरू...राहुल गांधी टार्गेटवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले आहे. यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आधीच हिंडेनबर्ग अदानी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते, असा टोला नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. 

तुर्की-सीरिया भूकंपात मृतांची संख्या 9500 च्या जवळपास, बचावकार्य सुरू

तुर्कस्तान-सीरिया भूकंपातील मृतांची संख्या 9,487 जवळपास गेली आहे. अजूनही आपत्तीग्रस्त देशांमध्ये बचाव कार्य सुरूआहे. लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ; ठाकरे गटाचा पलटवार

उद्धव ठाकरे यांनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची आहे. उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, असा पलटलवार शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी केला आहे.

लोकसभेत लोकशाहीची हत्या झाली, काँग्रेसचा आरोप

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा झाली. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दीक मारामारी झाली आणि एकमेकांवर हल्लेही झाले. अदानीच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत सरकारला घेरले. दरम्यान राहुल गांधी यांचे वक्तव्य रेकॉर्डवरुन काढले आहे. त्यामुळे लोकसभेत लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर

आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक नाही; पोलिसांनी दिली माहिती

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमधील कार्यक्रमादरम्यान रमाई यांची मिरवणूक थांबवल्यामुळे राडा झाला. अशी माहिती समोर आली होती. दरम्यान औरंगाबात ग्रामीण पोलिसांनी मोठा दावा केला आहे. एकही दगड फेकला नाही. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

महाड MIDC मध्ये भिषण आग आगीत कामगार आडकले

महाड MIDC मध्ये भिषण आग लागली आहे. तर आगीत कामगार आडकल्याची भिती वर्तवण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना नवं आव्हान, म्हणाले...

मागील काही दिवसांपुर्वी आदित्या ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढून जिंकून दाखवा असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज पुन्हा राज्याच्या अधिवेशनापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवून दाखवा,असं नवं आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ

औरंगाबाद येथील आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात झालेल्या सुरक्षेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी, अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालकांना लिहिले पत्र

औरंगाबाद येथील आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात झालेल्या सुरक्षेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. दानवे यांनी डीजीपींना या उल्लंघनाकडे गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

धक्कादायक! खेळताना पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज येथील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com