दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking notifiction

दिवसभरात देश-राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लीकवर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ का केली आहे, याचे कारण स्पष्ट नसून, भाजपच्या आठ मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानावरून दिल्लीत राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, आता दिल्लीत देखील आंदोलन पाहिला मिळालं. सत्तारांच्या फोटोला काळं फासत दिल्लीत राष्ट्रवादी कडून निषेद नोंदवला.

थिएटर चालक-मालकांना धास्ती, नाशिक शहरात हर हर महादेवचा एकही शो नाहीत

हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने देखील संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. राज्यातील विविध संघटना संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्षेपाला पाठिंबा देत आहे. ठिकठिकाणी हर हर महादेवचे शो बंद पाडले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्वच थिअटर चालक-मालकांनी एकही शो सुरू ठेवलेला नाही. नाशिकमधील सर्वच शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

गुजरात निवडणुकीबाबत अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. 10 नोव्हेंबरला भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पर पडणार आहे.

सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानावरून आता शिवसेना आक्रमक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, शिवसेनेच्या नेत्यांकडूनही सत्तार यांच्यावर टीका करण्यात आलीय. अब्दुल सत्तार हे नेहमी निजामाच्या प्रवृत्तीने बोलतात अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून, चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची मागणी केलीय.

भारत जोडो यात्रेतून श्रीजया अशोक चव्हाण राजकीय पदार्पण करणार?

काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात व माजी मुख्यमंत्री अशोक व अमिता चव्हाण यांची कन्या श्रीजया हिचे राजकीय पदार्पण आता निश्चित झाले आहे. भारत जोडो यात्रेच्या होर्डीगवर श्रिजा चव्हाण झळकली. त्यानंतर आज राहुल गांधी बरोबर श्रीजा चालली. यात्रा माध्यमातून श्रिज समोर आली...श्रीजा लॉन्चिंग भारत जोडो यात्रेतून झाल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. हर हर महादेव चित्रपटावर छत्रपती संभाजी महाराज यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे छ.संभाजी महाराज यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत सध्या असलेल्या Y+ ऐवजी छ. संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याचे निधन

भारत जोडो यात्रा दरम्यान नांदेड जिल्ह्यात अटकलीमध्ये काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 'भारत जोडो यात्रे'चे झेंडा तुकडीचे संचालन केले. त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी त्यांचे दुःखद निधन झाले.

पुण्यात कॅम्प परिसरात गुरु नानक देवजी जयंती धूमधडाक्यात साजरी

शीख धर्मात दरवर्षी गुरु नानक देव जी यांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते आहे. यंदा ही हा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. पुण्यात कॅम्प परिसरात असणाऱ्या गुरुनानक दरबार मध्ये देखील या उत्सवानिमित्त गुरुद्वारात फुलांची सुंदर आरास करण्यात आली असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली आहे. दरबारात कीर्तन, भजन यासह अनेक उपक्रम राबवण्यात येत असून गुरूनानक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

नाशिकरोड येथील पवारवाडी परिसरात गोदामाला आग

नाशिकरोड येथील पवारवाडी परिसरात असलेल्या भगवती लान्सजवळ एका गोदामास अचानक आग लागल्याची घटना सकाळी घडली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. मात्र परिसरातील नागरिकांच्या सावधानतेमुळे अग्निशमन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यश आले असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

'हर हर महादेव' बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

राज्यात ‘हर हर महादेव' या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये इतिहासाचा विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा किरकोळ जखमी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान उजव्या हाताला मार लागल्याने जखमी झाला त्यानंतर काही वेळातच फलंदाजीच्या सरावासाठी रोहित नेटवर परतला आहे.

माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी राज्यमंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध आयपीसीच्या ४२० आणि ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे दापोली पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.