Marathi News Live Update : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

CID: कालव्यात सापडली हत्या झालेल्या बांगलादेशी खासदारची हाडे

बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीआयडीने शोधमोहीम तीव्र केली आहे. रविवारी सीआयडीने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका कालव्याजवळून मानवी हाडांचे काही भाग जप्त केले.

NCP: धीरज शर्मा यांची राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी धीरज शर्मा यांची राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच शर्मा यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Bengaluru Rain: पुण्यानंतर बंगळुरही तुंबले

बंगळुरूच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याने रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्यान काल पुण्यातही प्रचंड पावसामुळे रस्ते पाणीमय झाले होते.

दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील गेम झोनमध्ये आग

दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कल येथील मिस्ट्री रूम्स या थीमवर आधारित अॅडव्हेंचर गेम झोनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी आग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भूतानचे पंतप्रधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भेटण्यासाठी दाखल

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भेटण्यासाठी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आज हे दोन्ही नेते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

पुढचे तीन तास काळजीचे! राज्यात 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

संततधारेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हे: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा

विजांसह पावसाची शक्यता: बीड, छ. संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी | अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा

नाशिकमध्ये दोन मित्रांनी दिला जीव

नाशिकमध्ये दोन जीवलग मित्रांनी ट्रेनच्या पटरीवर आपलं जीवन संपवलं आहे.

युवक काँग्रेसच्या वतीने भोपाळमध्ये निदर्शने

कथित नर्सिंग घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशातल्या भोपाळ येथे युवक काँग्रेसच्या सदस्यांनी निदर्शने केली.

मुंबई-पुणे चार एक्स्प्रेस गाड्या रद्द

मुंबई ते पुणे धावणाऱ्या चार एक्स्प्रेस रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत.

बीडच्या वडवणी येथे बंदची हाक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बीडच्या वडवणी येथे बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमवारी वडवणीचं बाजारपेठ बंद असणार आहे.

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई, पाच लुटारुंना काही तासातच केले जेरबंद!

येथील पेट्रोल पंप मालकास मारहाण करून तीन लाखांची लुटमार करणारे तिघे येथील शहर पोलीसांनी ८ तासात अमरावतीत जेरबंद केले. तीन अज्ञात लुटारूंनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायरा पेट्रोल पंपाचे मालक दिनेश बुब यांना पेट्रोल पंपापासून २०० मिटर अंतरावर मारहाण करून त्यांच्याजवळची अडीच लाखाची रक्कम घेऊन काल रात्री साडे नऊच्या दरम्यान पोबारा केला होता.

उल्हासनगरात पहिल्यादाच कर निर्धारक पदावर पालिकेच्या महिला अधिकारी

Ulhasnagar News: आयुक्त अजीज शेख यांनी उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता कर(टॅक्स)विभागाच्या कर निर्धारक व संकलक पदावर निलम कदम-बोडारे यांची प्रभारी नियुक्ती केली आहे.आजमिती पर्यंतच्या इतिहासात या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या त्या महानगरपालिकेच्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या असून त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला आहे.

Maratha Reservation: सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम - मनोज जरांगे

सरकारला चर्चा करण्यासाठी दार खुले आहे. अद्याप सरकार कडून संपर्क झाला नाही सरकारची काय भावना आहे हे मला माहित नाही.

Mumbai : मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा

Mumbai Rain : सर्वसामान्यपणे ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो मात्र, यंदा दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे की मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. मुंबईत दाखल होण्याचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Kolkata : बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ममता बॅनर्जींनी वाहिली श्रद्धांजली

Kolkata : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी आदिवासी प्रतीक बिरसा मुंडा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांची निर्भीड देशभक्ती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. 9 जून 1900 रोजी रांचीच्या जुन्या सेंट्रल जेलमध्ये बिरसा मुडा यांचे निधन झाले होते.

Pune: "पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच..."; जयंत पाटील यांचे ट्वीट

Pune: पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाबद्दल जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!"

मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकपदी अरविंद मालखेडे

भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील अधिकारी अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला.

Pratap Jadhav: शिवसेना खासदार प्रतापराव जाधव होणार केंद्रीय मंत्री

शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रीपदासाठी फोन आला असल्याचे वृत्तसमोर आला आहे.

NDA Government: ज्योतिरादित्य सिंधियांना मिळणार मंत्रीपद  

ज्योतिरादित्य सिंधिया यांना मंत्रीपादाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची बातमी समोर आली आहे.

केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील खासदारांना फोन

केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील काही खासदारांना दिल्लीतून फोन आल्याची माहिती आहे. भाजप खासदार नितीन गडकरी, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना फोन आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्ही मराठीने दिले आहे.

सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट; पुढील तीन-चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील तीन-चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई पावसाच्या जोरदार सरी, अनेक सकल भागात साचले पाणी

आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून जागोजागी पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे. मुंबईचा पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. दहिसर पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित केले जात आहे.

MMR रिजन मधील ४७ बार वर कारवाई;  ५-१० दिवस बार बंद ठेवण्याची शिक्षा

MMR रिजन मधील ४७ बार वर कारवाई करण्यात आली आहे. ५-१० दिवस बार बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे. परवाने देखील स्थगित करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. वेळेचं पालन न करणे, अल्पवयीन मुलांना मद्य देणे तसेच मद्य पिण्याचा परवाना न देता (daily permit) मद्य दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व बार आणि दारूच्या दुकानांना प्रवेशद्वार तसेच काउंटर समोर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांच्या हालचालींवर रिअल टाईम मध्ये लक्ष ठेवणे शक्य जाईल.

PM Modi: नरेंद्र मोदी युध्द स्मारकावरून दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शपथ घेणार आहेत. त्यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी सकाळी साडेसहा वाजता राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सात वाजता माजी पंतप्रधान अटल बिहारवाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच सकाळी साडेसात वाजता वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले.

डेक्कन क्विन या एक्सप्रेस आणि पुणे-लोणावळा दरम्यान सहा लोकल रद्द

मध्य रेल्वेने पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावर कामशेत- तळेगाव दरम्यान किमी 154/0-1 येथे असलेल्या पुल क्रमांक 154/1 चे लोखंडी गर्डरच्या कामासाठी साहा आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे डेक्कन क्विन या एक्सप्रेस आणि पुणे-लोणावळा दरम्यान सहा लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

आज मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत, त्यांच्यासह इतरही काही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. यासह राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पाणी साचल्याच्या, घरात पाणी शिरल्यच्या घटना घडल्या आहेत, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.